vaccination vaccination
उत्तर महाराष्ट्र

विरोध झुगारून 'ती'ने करून घेतले लसीकरण !

कोरोना महामारी पासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम पर्याय

जगदीश शिंदे


साक्री ः
कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून जनता शोधते एक ना अनेक उपाय... तर दुसरीकडे आजाराने बाधित रुग्णांची (corona patient) आणि रुग्णांच्या नातेवाईकांची उपचारासाठी सुरु आहे धडपड... अशातच लसीकरणामुळे नागरिकांच्या उंचावल्यात अपेक्षा... यातही अफवांचे फुटलेय पेव... असे असताना "ती" मात्र कुटुंबियांचा विरोध झुगारून पुढे आली न् जुमानता - न घाबरता "ती"ने लसीकरण (corona vaccination) करून घेतले. "ती"च्या या धाडसाचे परिसरात सर्वत्र होतेय कौतुक केले जात आहे. (unbelieving rumors old woman took corona vaccine)


कोरोनावर मात करता यावी यासाठी अनेक गावात लसीकरणाची सुविधा उपलब्ध होत असून देखील नागरिक लसीकरण करून घेण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसते आहे. मात्र याला अपवाद तालुक्यातील देवजीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या तोरसपाडा येथील झुलीबाई सोनू देवरे (वय 73) ठरल्या असून कुटुंबातील सदस्यांनी केलेला विरोध झुगारुन झुलीबाई यांनी लसीकरण करून घेत सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे अवाहन देखील केले आहे.
कोरोना महामारी पासून स्वतःचा बचाव करून घेण्यासाठी लसीकरण हा सर्वोत्तम पर्याय सध्या तरी नागरिकांच्या समोर उपलब्ध झाला आहे. सर्वांनी लसीकरण करून घ्यावे हा आग्रह आरोग्य यंत्रणेकडून सातत्याने केला जातोय. झुलीबाई यांनी लसीकरणाबाबत दाखविलेला प्रतिसाद हा परिसरासह समाज माध्यमांवर चर्चेचा विषय ठरलेला आहे. त्यांच्या विधायक क्रूतीमुळे लोकप्रतिनिधी आणि आरोग्य यंत्रणेनेच्यावतीने छोटेखानी शाल, श्रीफळ, साडीचोळी देत पोलीस पाटील सौ वृषाली शेवाळे, सचिन शेवाळे,डॉ. हेमाली खैरनार यांनी सत्कार देखील केला आहे.

सुमारे पंधराशे लोकवस्तीच्या देवजीपाडा ता.साक्री येथे आरोग्य यंत्रणेच्या वतीने विजय पाटील, श्रीमती एस व्ही साबळे, एस टी रोकडे, के ए पाडवी, निखिल पवार, पी डी राऊत, पी पी पाटील आदि कर्मचाऱ्यांच्या पथकाद्वारे लसीकरण मोहीम राबविण्यात आली. गावातील आदिवासी बांधवांनी मात्र लसीकरणाकडे पाठ फिरविली. गावातील सुमारे तीनशे पंधरा नागरिकांनी या वेळी लसीकरण करून घेतले.यात झुलीबाई या आदिवासी महिलेने देखील लसीकरण करून घेतले.

वयोवृद्ध आणि अशिक्षित असलेल्या झुलीबाई यांच्या या क्रूतीचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांनी लसीकरणाबाबत दाखविलेला सकारात्मक प्रतिसाद हा इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे. यामुळे प्रत्येकाने स्वतःहून पुढे येत लसीकरण करून घेणे हे स्वतःसोबत गावाच्या देखील हिताचे असल्याचे गावाच्या पोलीस पाटील सौ. वृषाली सचिन शेवाळे यांनी म्हटले आहे.


कोरोनापासून बचावासाठी होत असलेल्या लसीकरणाला आदिवासी बांधवांकडून समाधान कारक प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. मी आदिवासी लोकप्रतिनिधी या नात्याने आवाहन करतो कि, प्रत्येकाने न घाबरता लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हे स्वतःसह कुटुंबाच्या रक्षणासाठी गरजेचे आहे. प्रत्येकाने पुढे येत लसीकरण करून घेत आरोग्य यंत्रणेस सहकार्य करावे.
- खंडू पोसलू कुवर

(unbelieving rumors old woman took corona vaccine)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूरांचा गड कोसळला; पालघर जिल्ह्यात महायुतीचा दबदबा वाढला

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: उमरगा विधानसभा मतदार संघात कोणाचा गुलाल उधळणार?

Satara-Jawali Assembly Election 2024 Results : साताऱ्यात भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले 1 लाख 40 हजार 120 मतांनी विजयी; राज्यात रेकॉर्डब्रेक मताधिक्य

Ambegaon Assembly Election 2024 result live: दिलीप वळसे-पाटील आठव्यांदा आमदार होणार; शिष्य देवदत्त निकम पराभूत

Maharashtra Election 2024: प्रविण दरेकरांचा 'तो' दावा खरा ठरला! राज्यात महायुतीचेच सरकार येणार

SCROLL FOR NEXT