सारंगखेडा : लग्नसराईत, दिवाळीत तसेच एखाद्या आनंद क्षणात मिठाई देण्याची परंपरा आहे. तरी स्वतःसाठी खरेदी केलेली मिठाई भेसळयुक्त तर नाही ना? याची खात्री ग्राहकांनी करून घेणे गरजेचे आहे. लाखोची उलाढाल होणाऱ्या मिठाई व्यवसायात मिठाईच्या रूपात ' स्वीट पॉयझन ' च बाजारपेठेत आणून ठेवले आहे.
शहरात मिठाईच्या दुकानात चमचमीत विविध प्रकारच्या रंग बेरंगी स्वस्तात मिठाई तयार करण्याचा आकर्षण पॅकिंगमधून ग्राहकांच्या माथी मारण्याचा गोरखधंदा सर्वत्र सुरू आहे. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासुनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नाही. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ग्राहकांनीही मिठाई खरेदी करतांना थोडे विचारमंथन करा. ज्यांच्याकडून मिठाई खरेदी कराल, त्याचा दर्जा तपासून पाहा.
फर्म चांगली आहे का, यासह त्याचा इतिहासही तपासा. मर्यादित काळ दुकान थाटणाऱ्या लोकांकडून, परप्रांतीय मिठाईवाल्यांकडून मिठाई घेतांना विचार करा नफा कमावून ते त्यांच्या राज्यात निघून जातील. यात ते ग्राहकांचे हित काय पाहणार, हा संशोधनाचा विषय असतो मैदामधील शुध्दताही तपासून पाहा. काही संस्था खुप चांगल्या पद्धतीने मिठाई बनवितात. त्यांची मिठाई थोडी महागडी असू शकते मात्र व्यवसायातून सेवा पाहणाऱ्या संस्था, आपले ब्रॅड टिकून राहण्यासाठी सतत धडपडणाऱ्या संस्था भेसळ करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे सर्वानी अन्नपदार्थातील भेसळीपासून सावध राहिले पाहिजे.
रसायने , रंगांपासून सावधान .
बहुतेक मिठाई मध्ये संबंधित पदार्थाचा स्वाद मिळण्यासाठी रसायनांचा वापर केला जातो. शरीराला हानिकारक असलेली रसायने आपण आपल्या पोटात घालतो. त्याचे पर्यवसान नंतरच्या काळात पोटदुखीत होते. रंगांचाही अतिवापर केला जातो. त्यामुळे चमचमीत मिठाई खायला व पाहायला चांगली वाटते परंतू तिच्या शरीरावर काय परिणाम होईल. याचा विचार करायला हवा. विक्रीचा दृष्टीने बनविलेल्या चमचमीत मिठाईतुन आपण कोणकोणते आजार शरीरात ढकलुन देतो, मिठाईवर चांदी सारखी चमकी लावून हे पदार्थ विकले जातात. ते आरोग्याला घातकच असतात.
लोकांच्या आयुष्याशी खेळ.
ग्राहक आपल्या दुकानातून विश्वासाने माल खरेदी करतो. मिठाई शक्यतो लहान मुले जास्त खातात. त्यामुळे दुकानदारांनी, व्यवसाय करतांना सेवा करण्याची भावना मनात ठेवावी. शुद्ध माल देऊन समाजाचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करावा. केवळ धंदा करून कमाईचा उद्देश ठेवू नये. आपला माल थोडा महाग दिला तरी ग्राहक ते मान्य करतात. चांगल्या दर्जाचा माल वापरला पाहिजे. कर्मचाऱ्यांची स्वच्छता पाहावी. काम करणाऱ्याचे आजार तपासून घ्यावे . भांडी स्वच्छ ठेवावेत. मिठाई तयार करण्याच्या ठिकाणी किटकांचा प्रादूर्भाव नाही ना, याची खातरजमा दुकानदारांनी करणे अत्यंत आवश्यक आहे .
अशी तपासा भेसळ
खवा मध्ये पिष्टमय पदार्थांची भेसळ होते. खवा पाणी एकत्र उकळल्यानंतर त्यावर आयोडियनचे काही थेंब टाकल्यास त्याचा रंग निळा होतो. म्हणजेच, भेसळ झाली आ . हे स्पष्ट होते . तुप आणि लोण्यात अनुक्रमे वनस्पती ( डालडा ) पिष्टमय पदार्थ टाकले जातात. वितळलेल्या तुपात तीव्र हायड्रोक्लोरिक अॅसिड साखर टाकावी त्यात भेसळ असल्यास रंग तांबडा होतो . लोण्यातही आयोडिन टाकावे . भेसळ असल्यास त्याचा रंग प्रथम करडा नंतर निळा होतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.