शहादा : सामाजिक वनीकरण विभागातर्फे (Department of Social Forestry) यंदा ९७ हजार ९०० रोपे लागवडीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी तयारी पूर्णत्वास आली आहे. पाऊस लांबल्याने झाडांची लागवड (Planting of trees) ही उशिरा करावी लागत आहे. वन विभागाकडून लावलेल्या झाडांच्या संगोपनासाठी स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन शहादा सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल एम. बी. चव्हाण (Forest Ranger M. B. Chavan) बोलतांना म्हणाले.
(forest department will plant ninety seven thousand trees in shahada division)
श्री. चव्हाण म्हणाले, की शासनाच्या दोन रोपवाटिका आहेत. त्यात दुधखेडा दीड लाख व मांडवी रोपवाटिकेत विविध प्रजातींची दीड लाख रोपे तयार आहेत. पाऊस चांगला झाल्यावर लागलीच विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्याचे रोपण केले जाईल. शासनातर्फे दर वर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाते. रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी संरक्षण मजूर लावण्यात येतात, परंतु तेही सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत असतात. या वेळेव्यतिरिक्त अन्य वेळी काही ठिकाणी जनावरे, बकऱ्या तसेच तत्सम मोकाट प्राण्यांकडून नुकसान होते, अशा वेळी स्थानिक पातळीवर ग्रामस्थांची मदत ही रोपवनवाढीसाठी आवश्यक आहे. रोपांचे कोणी नुकसान करत असेल तर तत्काळ स्थानिक वनपाल अथवा कार्यालयात माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
तारेवरची कसरत
सामाजिक वनीकरण शहादा व अक्राणी या दोन तालुक्यांत फक्त तीन क्षेत्रीय कर्मचारी असल्याने रोपवन संरक्षण करताना तारेवरची कसरत करावी लागते. यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. कोविडमुळे कर्मचारी वर्गाच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्याने प्रसंगी खासगी नागरिकांना रोजंदारीवर लावून वनसंगोपन केले. स्थानिक नागरिकांनी झाडे ही आपली संपत्ती आहे, असे समजून सहकार्य करणे गरजेचे आहे. अन्यथा दर वर्षी वन विभागातर्फे रोपांची लागवड होते, परंतु संगोपनाअभावी उद्देश सफल होत नाही.
अनरद टेकडी हिरवीगार करण्याचा मानस
अनरद, कवठळ टेकडी झाडे नसल्याने उघडीबोडकी दिसते. स्थानिक दोन्ही गावांचे ग्रामस्थ, विविध वृक्षप्रेमी संस्था, वृक्षमित्र, पर्यावरणप्रेमी, शहादेकर नागरिक यांच्या सहकार्याने टेकडी हिरवीगार करण्याच्या मानस आहे. या टेकडीवर दोन गट लागवड असून, ३३ हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. रोपे लागवडीसाठी खड्डे तयार आहेत. पाऊस झाल्यावर तेथे रोपण केले जाईल. वृक्षलागवडीनंतर स्थानिक नागरिक व इतर संस्थांचे संगोपनासाठी सहकार्य अपेक्षित आहे.
तीन लाख रोपे तयार
शासनाच्या दुधखेडा व मांडवी या दोन रोपवाटिका आहेत. भविष्यात स्थानिक नागरिकांना रोजगाराचे साधन निर्माण व्हावे, उत्पादन मिळावे यासाठी महू, चारोळी, सादडा, करंज, खैर, बोर, आवळा, शिसू, गुलमोहर, काशीद, साग, बांबू, उंबर, सुरू, वड, बेल, रक्तचंदन, शिरस, लिंब यांसारख्या २५ ते २६ प्रजातींची सुमारे तीन लाख रोपे तयार करण्यात आली आहेत. यातील काही झाडांच्या फळांपासून नागरिकांना रोजगार मिळेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.