शहादा : स्वर्गवासी अण्णासाहेब पी.के. पाटलांनी परिसरात अनेक सहकारी संस्था (Co-operative society) उभ्या केल्या. अनेकांना रोजगार दिला. सहकार चळवळीची कोणतीही नवी भूमिका शहादयातून असायची. अण्णासाहेबांनी कोणतीही गोष्ट हातात घेतली की ती पूर्णत्वास आणायची हा त्यांचा स्वभाव होता. शेतकरी (Farmers) जगला पाहिजे यासाठी त्यांनी उपसा सिंचन योजनांचा (Upsa Irrigation Schemes) सपाटा लावला होता. एवढ्या झपाट्याने काम करणारा नेता महाराष्ट्रात अभावाने घडतो. स्वाभिमानाने कसे जगावे हा आदर्श अण्णांनी निर्माण केला. असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil)यांनी केले.
लोणखेडा (ता. शहादा) येथील पाटीदार मंगल कार्यालयात सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के. पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या पूजनानंतर झालेल्या आदरांजली सभेत श्री पाटील अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री अॅड.के. सी. पाडवी, माजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल, माजी पर्यटन विकास मंत्री आ. जयकुमार रावल, रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खा. रक्षाताई खडसे , आ. राजेश पाडवी, आ.डॉ. विजयकुमार गावित,आ. काशीराम पावरा, आ.डॉ.सुधीर तांबे, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, माजी आमदार शिरीष चौधरी, सातपुडा साखर कारखान्याच्या माजी अध्यक्षा कमलताई पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे,धुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार रंधे, बबन चौधरी,रविजी अनासपुरे, भरत माळी, पी. के. अण्णा पाटील फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तमनामा ग्रंथ, मानवशास्त्र देऊन सत्कार करण्यात आला.
व्रतस्थ जीवन समाजाला वाहिले....
यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले,पी. के. अण्णा पाटील समाजसुधारक होते.त्यांनी पुरोगामी आचार समाजामध्ये बिंबवला.त्यांचा स्मारकातुन प्रेरणा मिळेल.विचार, कर्तृत्व बघितले तर त्यांनी व्रतस्थ जीवन समाजाला वाहिले. परिवर्तन वादी समाजसुधारक, देशभक्ती सोबत समाजभक्ती, पीडित, शोषित गटाला न्याय मिळवून दिला. समाजातील चुकीच्या प्रथा बंद केल्या. आदर्श समाज घडविण्यासाठी शिक्षण महत्वाचे आहे.त्यासाठी परिसरात शिक्षणाची गंगा आणली.त्यातून तरुणांना शिकण्याची संधी मिळाली.आज येथील तरुण शिकून सातासमुद्रापार गेला. समाजात नावलौकिक मिळविला. आण्णासाहेब सर्वसमावेशक होते त्यांनी पीडित, शोषित, दुर्लभ, आदिवासी बांधवांसाठी काम केले. विविध उद्योगातून परिसरात रोजगार आणला.शेतकऱ्याला ताट मानेने जगता आले पाहिजे यासाठी उपसा सिंचन योजना आणल्या. यावेळी गुलाबराव पाटील यांनी अण्णासाहेबांच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी केलेल्या कार्याची जाणीव उपस्थितांना करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विजय प्रकाश शर्मा यांनी केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.