Robbery gang 
उत्तर महाराष्ट्र

टिप देणाऱ्यांची हजारांत बोळवण..आणि अ‍ॅक्शनवाले लाखांत

Dhule Crime News: २३ ऑगस्टला महामार्ग ते उंटावद या रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले होते.

सचिन पाटील


शिरपूर : बँकेत भरणा करण्यासाठी जाणाऱ्या कर्मचाऱ्याकडून साडेतेरा लाख रुपये लुटल्याच्या (Robbery) गुन्ह्यात शहर पोलिसांनी (Shirpur city Police) चार संशयितांना अटक केली असून, न्यायालयाने संशयितांना पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात आंतरजिल्हा टोळीचा (Robbery gang) सहभाग असून, तुरुंगातील सहकाऱ्यांनी एकत्र येऊन हा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. संशयितांकडून काही रोकड, स्कॉर्पिओ कार व दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतली.


रेडिएंट कॅश मॅनेजमेंट कंपनीचे कर्मचारी जयपाल गिरासे (वय ३६, रा. आमोदा, ता. शिरपूर) यांना २३ ऑगस्टला महामार्ग ते उंटावद या रस्त्यावर चाकूचा धाक दाखवून तिघांनी लुटले होते. त्यांच्याकडील १३ लाख ४७ हजार ७६१ रुपये असलेली बॅग घेऊन संशयितांनी पळ काढला. गिरासे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्यात लुटलेली रक्कम मोठी असल्याने पोलिसांनी नियोजनबद्ध तपास केला. निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक किरण बाऱ्हे यांनी परिसर पिंजून काढला. त्या वेळी संशयितांनी सोडून दिलेली होंडा युनिकॉर्न दुचाकी हाती लागली. त्यानंतर एकेक धागा बाजूला करीत पोलिसांनी एकापाठोपाठ चार संशयितांच्या मुसक्या आवळल्या. पोलिस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी केल्यानंतर या गुन्ह्याचे स्वरूप उघड झाले.


टिप ते अ‍ॅक्शन
गिरासे सहा वर्षांपासून रेडिएंट कंपनीत कार्यरत आहेत. पेट्रोलपंप व अन्य कॅश पॉइंटवरून रोकड ताब्यात घ्यायची आणि संबंधितांच्या बँक खात्यात भरायची, असे त्यांचे काम आहे. त्यांच्याकडे प्रत्येक भरण्यापूर्वी १० ते ३० लाखांपर्यंत रोकड असते, याची माहिती त्यांच्या शेजारी राहणाऱ्या संशयिताला होती. ताडी पिताना त्याने दुसऱ्याला ती बाब सांगितली. साथीदारांची व्यवस्था झाली. शेजाऱ्याने गिरासे यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली. त्यांच्या जाण्या-येण्याच्या वाटा हेरल्या. ठरलेल्या दिवशी त्याने टिप दिली आणि अ‍ॅक्शनची जबाबदारी असलेल्या साथीदारांनी गेम बजावला.


आंतरजिल्हा टोळी
या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यातील चार जणांसह आणखी काही जणांचा समावेश असून, बरीचशी रोकड त्यांच्या ताब्यात आहे. टिप देणाऱ्यांना त्यांनी गुन्ह्यानंतर काही वेळातच रोख पैसे दिले. काही हजारांवर बोळवण केल्याने अटकेतील संशयित मनातून चिडले होते. या गुन्ह्यात पळ काढण्यासाठी वापरलेली स्कॉर्पिओही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. अन्य संशयितांना अटक करणे शिल्लक असल्याने त्यांचा तपशील नंतर देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT