सोनगीर : आयुष्यात अडचणी सर्वांना येतात. पण संयम, चिकाटी, अपार परिश्रम आदींनी आपण त्यावर मात करू शकतो आणि आपल्याला हवे ते नक्की मिळवू शकतो. यशाचा मार्ग खडतर असला तरी अशक्य नाही. ठाम निश्चय करूनच उपजिल्हाधिकारी झाले. पण अजून जीवनप्रवासाचा थांबा आलेला नाही. त्यासाठी कष्ट सुरूच आहे. उपजिल्हाधिकारी झालेल्या मानसी सुरेश पाटील सांगत होत्या.
मानसी पाटील यांची 2019 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात मुलींमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून उपजिल्हाधिकारीपदी झेप घेतली. सध्या त्या नाशिक येथील जीएसटी विभागात विक्रीकर निरीक्षक म्हणून काम पहात आहे.
उपजिल्हाधिकारी पाटील हे जवखेडे ता. अमळनेर येथील मुळ रहिवासी असूून त्यांचे वडील सुरेश पाटील हे विद्यानिकेतन शाळेत शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण जळगावच्या अभिनव शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण प. नं. लुंकड कन्या शाळेत मराठी माध्यमातून झाले. दहावीला विशेष प्राविण्य मिळवून जळगावच्या शासकीय तंत्रनिकेतनातून संगणक विषयात पदविका प्राप्त केली. त्यानंतर बांभोरी अभियांंत्रिकी महाविद्यालयात पदवी घेतली. 2015 मध्ये स्पर्धा परिक्षेत भाग घेतला. 2016 मध्ये परिक्षा दिली त्याचा निकाल 2017 मध्ये लागला. आणि विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली.
तेवढ्यावर न थांबता प्रयत्न व अभ्यास सुरूच ठेवला. 2019 मध्ये लोकसेेवा आयोगाची परीक्षा दिली. तिचा निकाल नुकताच लागला. त्यात यश मिळून उपजिल्हाधिकारी झाले. मात्र अद्याप नियुक्ती झाली नाही. उच्च पदस्थ अधिकारी व्हायचे स्वप्न बाळगले होते.
वडील व काकांचे प्रोत्साहन मिळाले. महागडे क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर दिला. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळाले. अभ्यासाचे योग्य नियोजन केले. सर्व प्रवासात संघर्ष करावा लागला. पण मेहनत घ्यायची तयारी असेेल तर यशस्वी होणे फारसेे कठीण नाही असे मला वाटते. दररोजच्या घडामोडींसाठी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावून ज्ञान अपडेट ठेवणे गरजेचे आहे.
- मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी
संपादन- भूषण श्रीखंडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.