residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

सुला विनियार्डसतर्फे चीनमध्ये वाईन निर्यात,नानजिंग ग्लोरीशी भागीदारी 

सकाळवृत्तसेवा

नाशिक ः जागतिकस्तरावर वाइन बाजारपेठेसाठी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनमध्ये येथील सुला विनियार्डस्‌तर्फे वाइन निर्यातीला सुरवात केली. भारतीय बाजारपेठेत "सुला'चा 65 टक्के हिस्सा आहे. तसेच सुला वाइन आशिया, युरोप, अमेरिका, कॅनडा, जमाईका, बेल्जीयम, डेन्मार्क, इटली, स्लोव्हेनिया, हंगेरी, फ्रांस, रशिया, जर्मनी, ऑस्ट्रिया, हॉलंड, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड, लंडन, जपान, श्रीलंका, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेपाळ, भूतान, मालदीव, युएई, न्युझिलंडमध्ये निर्यात केली जाते. 

  सुला विनियार्डसने नानजिंग ग्लोरी इंटरनॅशनल समवेत भागीदारी केली आहे. ही कंपनी चीनमधील आघाडीची आयातदार व वितरक कंपनीपैकी एक आहे. नानजिंग ग्लोरीतर्फे सुरवातीला चीनमधील ठराविक प्रांतांमध्ये लक्ष केंद्रित केले जाईल. त्यात जीअंगसु, शानडॉंग, शांघाई, झेजिंग, अनहुई आणि हॅंगझु या प्रांतांचा समावेश आहे. पहिल्या टप्यात सुपरमार्केट, रेस्टॉरंटसमवेत 200 रिटेल आऊटलेट्‌समध्ये वाईन उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी सुला ब्रूट ट्रॉपिकल, सुला सौवीगनॉन ब्लॅंक, सुला दिंडोरी रिझर्व्ह शिराज आणि सुला शिराज या वाइनचा समावेश असेल. नानजिंग ग्लोरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी म्हणाले, की भारतातील सर्वात मोठ्या वाइनरीसमवेत भागीदारी करताना आम्ही आनंदी आणि उत्साही आहोत. सुला विनियार्डसची वाइन आमच्या बाजारपेठेत अवगत करणे, ही आमच्यासाठी गौरवशाली बाब आहे. 


ओमानमध्ये विस्ताराचे धोरण 
मध्य-पूर्व देशांपैकी ओमान मध्ये पुढील टप्यात वाइन पोचवण्याचे धोरण "सुला'चे आहे. 2005 मध्ये देशातील पहिले वाइन टेस्टींग रूम स्थापन करून वाइन टुरीझम क्षेत्रात "सुला'ने मैलाचा दगड रोवला. 2010 मध्ये 'बियॉन्ड' हे पहिले 'विनियार्ड रिसॉर्ट', तर 2017 मध्ये "द सोर्स' हे देशातील पहिले हेरीटेज वायनरी रिसॉर्ट साकारले. गेल्यावर्षी सुमारे साडेतीन लाख व्यक्‍तींनी सुलाला भेट दिली. 2016 मध्ये "ड्रिंक्‍स बिझनेस' पुरस्कार पटकावणाऱ्या सुलाने जुलै 2018 मध्ये सर्वाधिक दहा लाख (1 मिलीयन) वाइन विक्रीचा टप्पा गाठणारी ही आशियातील पहिली वाइन कंपनी ठरली. सुलातर्फे निम्मी ऊर्जा सौरऊर्जा निर्मितीतून उपलब्ध करण्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jefferies Stocks: शेअर बाजार कोसळतोय; गुंतवणूक कुठे करावी? जेफरीजने सांगितले हे 14 स्टॉक खरेदी करा, होताल मालामाल

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मतदान केंद्रावरील भाजपाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार

Assembly Election 2024: बीडच्या पोलिसाचा मुंबईत कारनामा! टपाली मतदानाचे फोटो गावाकडे पाठवले, गुन्हा दाखल

'मुश्रीफ ED ला घाबरून भाजपच्या पंक्तीत बसले, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, निवडणुकीत त्यांना पाडा'; शरद पवारांचा हल्ला

IPL Mega Auction 2025: सातवीत शिकणाऱ्या Vaibhav Suryavanshiला डिमांड; जाणून घ्या १३ वर्षीय पोराची कमाल...

SCROLL FOR NEXT