residentional photo 
उत्तर महाराष्ट्र

ऐन दिवाळीत उतरली झेंडू फुलांची पिवळी  झळाळी ! परतीच्या पावसाचा फटका

अमोल खरे : सकाळ वृत्तसेवा

मनमाड - परतीच्या पावसामुळे झेंडू फुलांचे अतोनात नुकसान झाले आहे. संततधारेमुळे फुले कुजू लागल्याने व्यापारीही खरेदी करेनासे झाले त्यामुळे झेंडूचा बाजारभावही कवडीमोल झाला आहे शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेली झेंडू फुले फेकण्याची वेळ आल्याने शेतकरी संकटात सापडला आहे दसऱ्यानंतर दिवाळी सणात झेंडूच्या फुलांना मागणी असते. मात्र, सणासुदीच्या तोंडावर आलेल्या परतीच्या पावसामुळे झेंड्र फुलांची पिवळी झळाळी पूर्णतः उतरली आहे. 

                           नगदी पीक म्हणून झेंडूशेतीकडे पाहिले जाते झेंडू फुलांना दसरा दिवाळीत मोठी मागणी असल्याने शेतकरी झेंडूशेती करतात प्रारंभीच्या काही वर्षांत झेंडूंच्या फुलांपासून चांगले उत्पन्न हाती येत होते. वातावरण पोषक असले तर झेंडू फुलांचा दर्जा चांगला असतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर झेंडू फुलांना मागणी असते फुल व्यापारी फुलांची खरेदी करतात. मात्र यंदा सुलतानी संकटांबरोबरच आस्मानी संकटांमुळेही शेतकरी हवालदिल झाला आहे. यंदा चांगले उत्पन्न मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी शेतात झेंडूची लागवड केली होती. झेंडू फुलांची मागणी दसरा दिवाळी सणाला अधिक असते. मात्र, दसऱ्याला झेंडूंच्या फुलांना अपेक्षित दर मिळाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता दिवाळी सणा कडे लागल्या होत्या.

     गेल्या दहा पंधरा दिवसांपासून दररोज पाऊस होत आहे. सततच्या पावसामुळे कमकुवत असलेली झेंडूची झाडे भुईसपाट झाली आहेत. झेंडूच्या पाकळ्यांत पावसाचे पाणी साचून झाडांचे वजन वाढत आहे. त्यामुळे ही झाडे वाकून जमिनीवर पडतात. तर जमिनीवर माती फुलांवर येऊन फुले कुजण्यास सुरुवात होते. परिणामी, फुलांचा दर्जा खालावला आहे पिवळा जर्द फुलांची झळाळी उतरली आहे. दिवाळी हा सण तोंडावर आला. मात्र, तोडणीस आलेले पीक
शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर खराब होत आहे. 

   या फुलांचा पावसामुळे पूर्णतः चिखल होत आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचा लागवड खर्च ही वसूल होणार नसल्याचे दिसत आहे.  ऐन दिवाळीत शेतकऱ्यांसमोरील मोठे संकट उभे राहिले आहे. फुल बाजारात व्यापारी खराब फुले खरेदी करत नाही. तर मागणी नसल्याने फुलांना अक्षरशः ५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळत असल्याने  शेतकऱ्यांनी वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी अक्षरशः फुले मनमाडच्या  बाजार समितीच्या आवारात फेकून दिल्याने बाजार समितीमध्ये फुलांचा खच पाहायला मिळत आहे. दसरा दिवाळी दोन पैसे मिळतील या आशेने शेतकरी झेंडूच्या फुले विक्रीला आणली दिवाळी गोड होईल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा असते. दसऱ्याला ३०  प्रतिकिलो विकलेली फुले आज चक्क ५ रुपये किलोने विकली जात असल्याने शेतकऱ्यांचा संताप झाला .त्यांनी फुले फेकून देने पसंत  केले. पावसामुळे झेंडूच्या फुलांची पिवळी झळाळी गेल्याने  शेतकऱ्यांनाची दिवाळी कडू होणार आहे 

 नगदी पीक म्हणून झेंडूशेती केली परंतु या परतीच्या पावसाने फुलशेतीचे मोठे नुकसान केले निवडणुकीनंतर दिवाळीसणासाठी फुले तोडली जाणार होती. मात्र सतत पाऊस पडल्याने, झेंडूची झाडे जमिनीवर पडून, फुले पाणी व मातीमुळे खराब झाली आहेत. विक्रीला आणलेल्या फुलांना पाच रुपयेपेक्षा कमी भाव मिळत असल्याने फुले फेकून द्यावी लागली दिवाळी सारख्या सणासुदीला रिकाम्या हाती घरी जाण्याची वेळ आली 
- रायभान पाटील, शेतकरी 

 शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू फुले बाजारात विक्रीला आणली होती मात्र पावसामुळे फुले खराब झाली त्यामुळे अपेक्षित भाव मिळाला नसल्याने शेतकऱ्यांनी फुले तशीच सोडून दिली पावसामुळे फुलांचा दर्जा खालावला असल्याने या फुलांना बाहेर मागणी नाही 
- महेंद्र शिरसाठ, व्यापारी, 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळासाहेबांची मोठी भूमिका, पंतप्रधानांचा थेट सदानंद सुळेंना फोन... सुप्रिया सुळेंनी सांगितला लग्नाचा 'तो' किस्सा!

Share Market Opening: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी घसरण; सेन्सेक्स- निफ्टी लाल रंगात

'राज्यात पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार, ते कोणी माई का लालही रोखू शकणार नाही'; अजितदादांचा कोणाला इशारा?

Gold Price: ओमान, यूएई, कतार आणि सिंगापूरच्या तुलनेत भारतात सोन्याचे भाव कमी; काय आहे कारण?

Mumbai Traffic: मुंबईच्या रस्ते वाहतुकीत उद्यापासून बदल, जाणून घ्या महत्त्वाची बातमी

SCROLL FOR NEXT