धुळे : येथील महापौर निवडणुकीत (Mayor Election) सत्ताधारी भाजपचे (BJP) उमेदवार प्रदीप कर्पे आपल्या सर्व ५० नागरसिकांची मते घेऊन विजयी झाले. या निवडणुकीत विरोधी पक्ष शेवटपर्यंत विखुरलेलेच राहिल्याचे स्पष्ट झाले, विरोधी पक्षाकडून शिवसेना (Shiv Sena) व अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. काँग्रेस (Congress) व एमआयएमने (MIM) निवडणूक लढवली. विशेष म्हणजे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या एकमेव उमेदवार तटस्थ राहिल्या. बसप उमेदवारही तटस्थ राहिल्या.
धुळे महापालिकेत आज महापौरपदासाठी निवडणूक झाली. जिल्हाधिकारी जलज शर्मा पीठासीन अधिकारी होते. आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ उपस्थित होते. नगरसेवकांनी ऑनलाईन मतदान केले. या प्रक्रियेत ७३ नगरसेवकांनी मतदानाचा हक्क बजावला. भाजपचे सर्व ५० नगरसेवक एकसंध राहिले.
महापौरपदासाठीच्या उमेदवारांना मिळालेली मते अशी :
-भाजप-प्रदीप कर्पे (विजयी)..............५०
-काँग्रेस- मदिना पिंजारी.....................१७
-एमआयएम- अन्सारी सईदा इकबाल....०४
-तटस्थ........…..........०२ (शिवसेना,बसप)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.