Businesswoman preparing to sell various items including Panati on the occasion of Diwali. In the second photo, the preparation of ready-made snacks. esakal
उत्तर महाराष्ट्र

Diwali 2023 : धुळ्यातील बाजारपेठ गर्दीने फुलली; रेडीमेड फराळाकडे अधिक कल

सकाळ वृत्तसेवा

Diwali 2023 : शहरासह जिल्ह्यात धनत्रयोदशीला अर्थात शुक्रवार (ता. १०)पासून दिवाळीला सुरवात होत आहे. दिवाळीनिमित्त शहरातील बाजारपेठ विक्रीतील विविध साहित्यांनी सजली आहे, तर गर्दीने फुलली आहे.

असंख्य कुटुंबांनी शॉपिंगसह विविध साहित्य खरेदीसाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या आग्रा रोडवर गर्दी केल्याचे दिसून आले. ( market in dhule full of people for diwali shopping dhule news )

त्यामुळे उलाढालीला सुरवात झाली असून, हातावर पोट असलेल्यांना रोजगाराची पर्वणी मिळाली आहे. आकर्षक आणि विविधरंगी आकाशकंदील, पणत्या, रोषणाईच्या माळा, रंगीबेरंगी तोरण, महालक्ष्मीच्या मूर्ती अशा नावीन्यपूर्ण वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत.

बाजारपेठेत विविधरंगी रांगोळ्या, रंगीबेरंगी पणत्या, प्लॅस्टिकची आकर्षक फुलांची तोरणे तसेच हार, श्री लक्ष्मीची मूर्ती, लक्ष्मीपूजनासाठी छोट्या-मोठ्या आकारातील लक्ष्मी (केरसुणी) तसेच पूजेसाठीच्या लाह्या, बत्तासे, श्री लक्ष्मीचे फोटो आदी साहित्य, वस्तूंची मोठ्या संख्येने दुकाने थाटली गेली आहेत.

फॅन्सी पणत्यांना मागणी

गुजरातमधून येणाऱ्या फॅन्सी पणत्यांना ग्राहकांची पसंती असल्याने विक्रेते गुजरातमधून माल मागवत असतात. परिणामी, मध्य प्रदेशातील केरसुणी, गुजरातच्या पणत्यांवर दिवाळी साजरी होते. दिवाळी आणि दिवे हे एक समीकरणच आहे. त्यामुळे दीपोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून घरोघरी दिवे लावले जातात.

हायटेक जीवनशैलीत फॅन्सी आकर्षक पणत्यांना वाढती मागणी आहे. त्यामुळे दर वर्षी शहरात गुजरातमधील अहमदाबाद येथून मोठ्या प्रमाणात फॅन्सी पणत्या विक्रीस उपलब्ध आहेत. सरासरी ५० ते पाचशे रुपयांपर्यंत पणत्या उपलब्ध आहेत.

केरसुणीचे महत्त्व

मध्य प्रदेशातील इंदूर, खंडव्यासह अन्य जिल्ह्यांत शिंदींची झाडे अधिक असल्याने त्या भागातून येणाऱ्या कच्च्या मालावर जिल्ह्यातील व्यावसायिक केरसुणी तयार करून विक्री करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजनाला केरसुणीचे अधिक महत्त्व असते. शिंदीच्या झाडांपासून केरसुणी तयार होते.

लक्ष्मीरूपी केरसुणीच्या उत्पादनावर यंदा अवकाळी पावसामुळे उत्पादन घटले आहे. परिणामी यंदा केरसुणीचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत दहा रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे नेहमी २५ ते ३० रुपयांना मिळणारी केरसुणी ४० ते ५० रुपयांपर्यंत मिळत आहे.

कच्चा माल आणून केरसुणीची बांधणी करण्याचा व्यवसायही निम्म्यावर आल्याने मध्य प्रदेशातून येणाऱ्या तयार केरसुणीची सध्या विक्री केली जात आहे.

फराळाचे दर वधारले

दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई, खमंग फराळाची मोठी रेलचेल असते. दिवाळी फराळाच्या दरात वाढ झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. धावपळीच्या जीवनशैलीत गृहिणींना फराळ बनवायला वेळ मिळत नाही. त्यामुळे तयार फराळाला गृहिणींची पसंती मिळते. या वर्षी महागाईची झळ तयार फराळालाही बसली आहे.

यंदा फराळाच्या किमतीत सरासरी १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून गॅस सिलिंडर, डाळी, तूप, जिरे, पोहे, मैदा, तेल, शेंगदाणे, खोबरा यांच्या दरात वाढ झाल्यामुळे त्याचा परिणाम दिवाळीच्या फराळाच्या दरावर झालेला आहे. यंदा रेडीमेड फराळ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे.

त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फराळ बनवून देणारे व ग्राहक नागरिकांची लगबग सुरू झालेली आहे. यंदा दिवाळीच्या फराळाच्या दरात वाढ झाल्याने लाडू, चिवडा, शंकरपाळी, चिरोटे, करंजी यांचे दर अधिक वाढले आहेत. डाळी महाग झाल्या आहेत, त्याचा परिणाम फराळाच्या किमतीवर झाला आहे. फराळामध्ये सर्वांत जास्त मागणी भाजणीची चकली, बेसन लाडू आणि शेव यास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार! उद्धव ठाकरेंची कोल्हापूरात घोषणा, महायुतीवर हल्लाबोल

सुशांत सिंग राजपूतची हत्याच! सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीचा धक्कादायक दावा; म्हणाली- एम्सच्या डॉक्टरने रिपोर्ट...

IPS Sanjay Verma : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती

Ladki Bahin Yojana : तुम्ही बळ दिलं तर... लाडक्या बहीणींना मुख्यमंत्र्यांचं मोठं आश्वासन; डिंसेंबरच्या हप्त्याबद्दलही सांगितलं

Dhule Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात बंडखोरांकडून आव्हान उभे; पाचही मतदारसंघांत मतविभाजनाचे डावपेच

SCROLL FOR NEXT