Nandurbar Fire Accident : शहादा तालुक्यातील कलमाडी तह येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला.
यामध्ये घरातील संसारोपयोगी वस्तू व बचत केलेली रोकड जळून खाक झाली. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. ( Massive cylinder blast at Kalmadi Tah nandurbar fire accident )
कलमाडी तह येथील परशुराम हसरथ ठाकरे कुटुंबासह शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी छाया परशुराम ठाकरे आशा वर्कर असून, त्या सायंकाळी आपले कार्य करून घरी आल्या.
त्या वेळी त्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता त्यांना गॅस सिलिंडर लिक झाल्याच्या अंदाज आला. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन मुलींसह घरातून तत्काळ बाहेर धाव घेतली. त्याच वेळी गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयंकर होता, की घरातील छत व भिंतीदेखील कोसळल्या असून, आगीच्या ज्वाला बाजूच्या परिसरापर्यंत पोचल्या. अचानक झालेला स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले असून, परिसरातील नागरिकांसह गावातील पोलिसपाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आल्याने व आगीचे चटके पाहता ग्रामस्थ भयभीत झाले होते. तापमान जास्त असल्याने आणखी आग लागू शकते या भीतीने गावातील नागरिक रात्रभर जागरण करीत होते. आगीत घरातील संपूर्ण संसारोपयोगी वस्तू तसेच रोकड खाक झाल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे.
ठाकरे कुटुंबाने शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. मंडळ अधिकारी निशिगंधा साळवे, तलाठी पी. एच. धनगर यांनी पंचनामा केला. या वेळी मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र पाटील, पोलिसपाटील आत्माराम ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.