Dhule News : कीटकजन्य आजारांवर नियंत्रणासाठी धुळे महापालिका व जिल्हा हिवताप कार्यालयातर्फे उपाययोजनांना सुरू आहेत. घरोघरी जाऊन ॲबेटिंग, फवारणी, धुरळणी तसेच संशयित रुग्णांचे रक्त नमुने घेणे, उघड्या गटारी, नाल्यांमध्ये ऑइल टाकणे यासह जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनीही दक्षता घ्यावी, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापालिकेने केले.(Measures to control pests diseases from municipality dhule news)
महापौर प्रतिभा चौधरी, आयुक्त अमिता दगडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना सुरू आहेत. यात शहराचे एकूण नऊ विभाग तयार करण्यात आले असून, प्रत्येक विभागात एक सुपर फील्डवर्कर, आरोग्यसेवक, दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी नियमितपणे प्रत्येक नागरिकाच्या घरी ॲबेटिंग, फवारणी, धुरळणी करत आहेत.
तसेच जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत नियमितपणे ताप संशयित रुग्णाचे रक्त नमुने घेतले जातात. ज्या ठिकाणी दूषित भांडी असतील त्या ठिकाणी औषध टाकले जाते. तसेच महापालिकेमार्फत नागरिकांच्या मागणीनुसार डबक्यांमध्ये गप्पी मासे सोडणे, उघड्या गटारी-नाल्यांमध्ये ऑइल टाकण्याची कार्यवाही सुरू आहे.
शहरात रोज दिलेल्या वेळेनुसार कार्यवाहीतून उपाययोजना झाल्याबाबत नागरिकांच्या स्वाक्षरी घेण्याच्याही सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.
कार्यवाहीत ६४ कर्मचारी
खासगी, सरकारी हॉस्पिटल्समधील संशयित रुग्णांची माहिती घेण्यासाठी आठ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व संशयित रुग्णांचे रक्त नमुने शासकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविले जातात. ज्या ठिकाणी संशयित तापरुग्ण आढळतो त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या ५० घरांचे रक्त नमुने घेतले जातात तसेच सात दिवस ॲबेटिंग, फवारणी, धुरळणी केली जात आहे.
महापालिकेचे ५२ व जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयातील १२, असे एकूण ६४ कर्मचारी कीटकजन्य आजारावर नियंत्रणासाठी कार्यरत असल्याचे महापालिकेने म्हटले आहे. आतापर्यंत नागरिकांना जनजागृती व प्रबोधनकामी शाळांमध्ये विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांना आजार होऊ नये यासाठी जनजागृती व प्रबोधन करण्यात आले. एक लाख हस्तपत्रके शहरात वाटप करण्यात आली आहेत.
याबाबत महापौर व आयुक्तांकडे दैनंदिन आढावा घेण्यात येत असून, यापूर्वीच या आजाराबाबत प्रभावी उपाययोजना करण्यासाठी बैठका घेऊन नियोजन करण्यात आल्याचे महापालिकेने म्हटले आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळावा. घासूनपुसून घरातील भांड्यात पाणी भरावे. कूलर, फ्रीज मागील ट्रे तसेच फुलदाणी नियमितपणे स्वच्छ करावी. परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन महापालिकेने केले.
ऑक्टोबरमध्ये एक पॉझिटिव्ह
धुळे शहरात ऑक्टोबरमध्ये एकूण ३५ संशयित तापरुग्ण आढळले. त्यातील २६ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह, तर एका वृद्धाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित आठ रुग्णांचे अहवाल प्रलंबित असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.