Dondai: BJP office bearers felicitating Neeraj Verma, MLA Jayakumar Rawal and colleagues in the railway question meeting. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Railway News : पुण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करावी : आमदार जयकुमार रावल

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : दोंडाईचा-पाळधीपासून तर नंदुरबार, नवापूरपर्यंत प्रत्येक ठिकाणाहून शेकडो नागरिकांचा पुण्याशी संबंध येतो. रोज किमान पाचशेवर प्रवासी पुण्याला ये-जा करतात. असे असताना पश्चिम रेल्वेलाइनवर एकही पुण्यासाठी रेल्वे उपलब्ध नाही.

त्यामुळे तातडीने पुण्यासाठी नवीन रेल्वे सुरू करावी, दोंडाईचा रेल्वेस्थानकावर विविध सुविधा निर्माण कराव्यात, जलद गाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी पश्चिम रेल्वेचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर नीरज वर्मा यांच्याकडे केली. (Meeting in Dondaicha MLA Jaykumar Rawal senior officials present new railway should be started for Pune Dhule News)

डीआरएम वर्मा हे सहकारी अधिकाऱ्यांसह तापी सेक्शनच्या निरीक्षणांतर्गत सुरत-पाळधी रेल्वेमार्गावर उपस्थित होते. यात एडीआरएम संजय शर्मा, एडीआरएम तिवारी, सीनिअर डीईएम सुनील मिश्रा, सीनिअर डीओएम पीयूष खंडारे, सीनिअर डीईएन योगेश शर्मा, सीनिअर डीएसटीई घनश्याम वर्मा, सीनिअर डीएसटीई बलराम वर्मा, सीनिअर डीईई धर्मेंद्रकुमार यांच्यासह स्थानिक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

दोंडाईचात समस्या जाणल्या

डीआरएम वर्मा यांनी दोंडाईचा रेल्वेस्थानकासंबंधी समस्यांची माहिती घेतली. प्लॅटफॉर्म क्रमांक पाच व सहावर ज्या ठिकाणी रॅक पॉइंट आहे तेथे शेड नसणे, प्रसाधनगृहासह अन्य अत्यावश्यक सेवा नसणे, ट्रक पास होण्याचा अरुंद रस्ता अशा विविध समस्या त्यांनी जाणल्या.

नंतर दोंडाईचा पालिकेत स्वतंत्र बैठक घेऊन समस्यांबाबत अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यांनी दोंडाईचा शहरातील व्यापारी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, जायन्टस क्लब, डॉक्टर्स संघटना, पत्रकार, प्रवासी संघटना प्रतिनिधींशी चर्चा केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकारात्मक चर्चा

दोंडाईचा येथील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर विविध मालाच्या संरक्षणासाठी शेड उभारणे, प्लॅटफॉर्मला उंची, ट्रकच्या वाहतुकीबाबत सुविधेची मागणी संयुक्त चर्चेत झाली. शेडबाबत प्रस्ताव तयार असून, लवकरच रेल्वे बोर्डाची मंजुरी घेऊ, इतर मागण्यांना सकारात्मकतेने प्रतिसाद देऊ, असे आश्वासन डीआरएम वर्मा यांनी दिले.

अमृत भारत स्थानकांतर्गत पश्चिम रेल्वेतून धुळे जिल्ह्यातील एकाही स्थानकाचा समावेश नाही याकडे डीआरएम वर्मा यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यात दोंडाईचा स्थानकाच्या समावेशाची मागणी झाली.

त्यामुळे लिफ्ट, सरकते जिने, प्लॅटफॉर्मला जोडणारा नवीन पूल, प्रवाशांसाठी वेटिंग एरिया, वायफाय सुविधा, स्टेशन सुशोभीकरण आदी सुविधा विकसित होऊ शकत असल्याने आग्रही मागणी झाली. पुणे येथे विरारमार्गे जाण्यासाठी नवीन एक्स्प्रेस सुरू करण्याबाबत पश्चिम रेल्वे सकारात्मक असून, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आश्वासन डीआरएम नीरज वर्मा यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT