नंदुरबार : सोशल मीडियावर संदीप जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतु, त्याच्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफिसमध्ये पडले असल्याचा संदेश खोटा असल्याची माहिती धुळे विभाग, प्रवर अधीक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर संदीप अशोक जाधव, नावाच्या मुलाचे इंडियन आर्मीचे नियुक्ती पत्र आले आहे. परंतु त्यावर चुकीचा पत्ता असल्यामुळे ते धुळे पोस्ट ऑफिसमध्ये पडले आहे. (Message on Social Media regarding Army appointment letter is fake Nandurbar News)
तो मुलगा भेटल्यावर नितीन राऊत (पोस्टमन) ८१४९७७४२००/ ७२७६४१८८९३ वर संपर्क करा. हा संदेश त्या मुलापर्यंत पोचला पाहिजे यासाठी कृपया हा संदेश जास्तीत जास्त शेअर करा. अशा प्रकारचा संदेश सोशल मीडियावर प्रसारित होत आहे. हा संदेश बनावट असून अशा प्रकारचे कोणतेही टपाल धुळे डाक विभागात आलेले नाही.
तसेच, उल्लेख केलेला भ्रमणध्वनी क्रमांक बंद असून नितीन राऊत नावाचा कोणताही व्यक्ती पोस्टमन म्हणून धुळे विभागात कार्यरत नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा बनावट संदेशाकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन धुळे विभाग, प्रवर अधीक्षक डाकघर, प्रताप सोनवणे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.