property tax  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : मालमत्ता करप्रश्‍नी धुळेकरांना दिलासा : आमदार फारूक शाह

धुळे शहरातील मालमत्तांसाठी कराची आकारणी दुपटीपेक्षा जास्त करू नये, असे स्पष्ट निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी दिले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : अनेक पटीने वाढ केलेली घरपट्टी रद्द करण्यात यावी, धुळे शहरातील मालमत्तांसाठी कराची आकारणी दुपटीपेक्षा जास्त करू नये, असे स्पष्ट निर्देश नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांनी दिले आहेत.

अशी माहिती आमदार फारूक शाह यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. (MLA Farooq Shah statement of dhule citizen Relief for property tax issues news)

शासनदरबारी सातत्याने धुळेकरांची व्यथा मांडल्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन धुळेकरांना दिलासा दिल्याचा दावाही आमदार शाह यांनी केला आहे.

धुळे शहारातील मालमत्ता करवाढप्रश्‍नी नागरिकांमध्ये असंतोष असल्याच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन काळात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव गोविंदराज यांची भेट घेऊन त्यांच्याकडे धुळेकरांची कैफियत मांडली.

त्यानंतर प्रधान सचिवांनी या विषयावर २ जानेवारीला बैठक घेतली. धुळे शहर हे आर्थिकदृट्या अतिमागास शहर असून, शहरात मोठे उद्योगधंदे नसल्याने मोठ्या प्रमाणात बेरोजगारी आहे.

त्यामुळे शहरातील नागरिकांना वाढीव घरपट्टी भरणे जिकिरीचे होत आहे. हद्दवाढ झाल्यामुळे शहर विकासकामाचा मोठा बोजा आहे.

शहरात यापूर्वीसुद्धा घरपट्टीवाढ करण्यात आले होती व आजसुद्धा मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून घरपट्टी वसूल केली जात आहे; परंतु ही घरपट्टी गरीब नागरिकांना भरणे अशक्य होत आहे.

या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे महापालिकेने ठराव करून घरपट्टीवाढ केले आहे ती वाढ आपल्या स्तरावरून रद्द करावी, वाजवी घरपट्टी लावण्यात यावी, अशी मागणी आपण प्रधान सचिवांकडे केल्याचे आमदार शाह यांनी म्हटले आहे.

बैठकीत अनेक पटीने वाढ केलेली घरपट्टी रद्द करण्यात यावी व धुळे शहरातील मालमत्तांसाठी कराची आकारणी दुपटीपेक्षा जास्त करू नये, असे स्पष्ट निर्देश प्रधान सचिव गोविंदराज यांनी दिल्याचा दावा आमदार शाह यांनी केला आहे.

शासनदरबारी सातत्याने धुळेकरांची व्यथा मांडल्यामुळे शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन धुळेकरांना दिलासा दिल्याचेही आमदार शाह यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Today: शेअर बाजाराचा मूड बदलला; आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Latest Maharashtra News Updates : फडणवीस मुख्यमंत्री झाले तर एकनाथ शिंदे यांना दिल्लीला जावे लागेल?

Nagraj Manjule : खाशाबा जाधवांवरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; नागराज मंजुळेंविरोधात समन्स

Mumbai: दारु पडली महागात; तीन तरुणांचा मृत्यू, वाचा नक्की काय घडलं?

Eknath Shinde Resignation: एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार? जाणून घ्या काळजीवाहू मुख्यमंत्री प्रक्रियेबद्दल

SCROLL FOR NEXT