Dhule News : शिंदखेडा तालुक्यातील विविध प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यात माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल यांनी विविध समस्यांची मांडणी केली.
यात जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे परिपूर्ण प्रस्ताव पाठवावा, मी निधीची व्यवस्था करतो, अशी हमी आमदार रावल यांनी दिली. (Mla Jaykumar Rawal say Submit completed proposal Brings funds Meeting on problems in presence of District Collector Dhule News)
जिल्हाधिकारी जलज शर्मा अध्यक्षस्थानी होते. आमदार रावल, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, गटनेते कामराज निकम, सभापती संजीवनी शिसोदे, सभापती महावीरसिंह रावल, जिल्हा परिषद सदस्य डी. आर. पाटील, पंकज कदम, धनंजय मंगळे, वीरेंद्रसिंह गिरासे, पंचायत समिती सभापती वंदना ईशी, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उपजिल्हाधिकारी महेश शेलार, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, प्रांताधिकारी प्रमोद भामरे, पी. एस. महाले, नियोजन विभागाचे ए. डी. राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे व्ही. आर. महाले, सहाय्यक संचालक नगररचना नंदकिशोर मोरे, शिंदखेडा तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे, गटविकास अधिकारी डी. एम. देवरे, भूमी अभिलेखचे एस. आर. भोई, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता पी. जी. पाटील, जिल्हा बॅंक संचालक राजेंद्र गिरासे, किशोर पाटील आदींसह सरपंच उपस्थित होते.
पुनर्वसनाचा प्रश्न
तापी नदीलगत गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न १९६८ पासून प्रलंबित आहे. पुराच्या धोक्यामुळे १९ गावांच्या पुनर्वसनाचा निर्णय शासनाने घेतला आहे; परंतु पुढील कार्यवाही झालेली नाही. केवळ जसाणेचे टाउन प्लॅनिंग विभागाकडून काम झाले आहे.
त्यामुळे दोन महिन्यांत जसाणेसह चार गावांमध्ये प्लॉट पाडून वितरित करण्याचे निर्देश आमदार रावल यांनी दिले. उर्वरित गावांना जमिनी खरेदीसाठी अपेक्षित निधीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा.
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न
देवी व वाडीचे पुनर्वसन होऊन अनेक वर्षे लोटली; परंतु देवीला पिण्याच्या पाण्याची सोय नाही. ही व्यवस्था करावी. वाडीतील अतिक्रमित घरांना देवीच्या धर्तीवर नियमानुकूल करून त्यांना लाभ देण्याबाबत सिंचन विभागाने प्रस्ताव सादर करावा. तापी नदीकाठावरील चावळदे येथे अनेक घरे पडली असून, ऐतिहासिक मंदिर खचण्यास सुरवात झाली आहे. याबाबत जिल्हाधिकारी शर्मा यांनी या गावाचा पुनर्वसनाचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याच्या सूचना दिल्या.
मदारी नाल्याची स्थिती
वाडी-शेवाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर बुराई नदीतील पाणी पाटचारीद्वारे मदारी नाल्यात टाकल्यास मेथी, वरझडी, कामपूर, सोनशेलू, दलवाडे अशा विविध गावांना लाभ होईल. यासाठी विधानसभेत मागणी केली होती. मग सर्वेक्षण झाले. याकामी चार कोटी ९१ लाखांचा निधी लागेल. तो मिळण्यासाठी पाठपुरावा करेन, असे आमदार रावल यांनी सांगितले.
अपूर्ण पाटचाऱ्यांचे काम
वाडी-शेवाडी प्रकल्पातून जाणाऱ्या पाटचारीमुळे अनेक गावांना लाभ होणार आहे; परंतु केवळ दोन शेतकऱ्यांच्या काही अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी सिंचन विभाग कोणताही प्रयत्न करत नाही, याकडे आमदार रावल यांनी लक्ष वेधले. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वीरेंद्रसिंह गिरासे आणि राजेंद्र देसले यांनी उपाय सुचविले. त्यासाठी पाटचारीचे काम पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार रावल यांनी दिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.