MLA Kadu assurance to provide benefits of schemes to disabled dhule news 
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : जिल्ह्यात 3 महिन्यांत गावनिहाय सर्वेक्षण; आमदार कडू यांची दिव्यांगांना योजनांचा लाभ देण्याची हमी

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : मिशन संवेदना उपक्रमांतर्गत दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येईल.

तसेच जिल्हा प्रशासनामार्फत प्रत्येक गावामधील दिव्यांगांचे येत्या तीन महिन्यांत सर्वेक्षण होणार आहे. ते पारदर्शकतेने होईल याची दक्षता प्रशासनाने घ्यावी, अशी सूचना देत सर्वेक्षणानंतर दिव्यांगांना ११ प्रकारच्या योजनांचा लाभ सरकार देणार असल्याची माहिती ‘दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान’चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक, मंत्री दर्जाप्राप्त आमदार बच्चू कडू यांनी दिली. (MLA Kadu assurance to provide benefits of schemes to disabled dhule news)

येथील पोलिस प्रशिक्षण केंद्राच्या सभागृहात ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगाच्या दारी’ या अभियानांतर्गत कार्यक्रमास आमदार कडू उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल, जिल्हा परिषद अध्यक्षा अश्विनी पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, जिल्हा परिषद सीईओ शुभम गुप्ता, मनपा आयुक्त सुनीता दगडे-पाटील, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, मनपा उपायुक्त विजय सनेर, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक उपायुक्त योगेश पाटील, जिल्हा परिषद उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, सभापती कैलास पावरा, संजीवनी शिसोदे, समाजकल्याण अधिकारी मनीष पवार, शिक्षणाधिकारी मोहन देसले, राकेश साळुंखे, अभियानाचे कृष्णा शिरसाट आदी उपस्थित होते.

देशात महाराष्ट्र प्रथम

आमदार कडू म्हणाले, की दिव्यांगांसाठी ८२ शासन निर्णय निर्गमित झाले असून, पाच टक्के निधी खर्च करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. पहिले दिव्यांग मंत्रालय शासनाने सुरू केले. दिव्यांगांसाठी घरकुल योजना राबविण्याचा मानस आहे. सर्व विभागांनी एकत्रितपणे दिव्यांगांच्या समस्या, तक्रारी दूर होण्यासाठी महिन्यातून केवळ एक दिवस त्यांना द्यावा.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले, की या कार्यक्रमात साडेपाच हजार लाभार्थ्यांना लाभ वितरित होत आहे. जिल्ह्यात मिशन संवेदना हा नावीन्यपूर्ण दहासूत्री कार्यक्रम राबविला जाईल. सीईओ गुप्ता म्हणाले, की आशा वर्करमार्फत जिल्ह्यात दिव्यांगांचे सर्वेक्षण केले जाईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पात्र दिव्यांगांना यूडीआयडी (वैश्विक ओळखपत्र) वितरित केले जाईल. महापौरांसह माजी सभापती अरविंद जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. जगदीश देवपूरकर, वाहिद अली यांनी सूत्रसंचालन केले. अतिरिक्त सीईओ चंद्रकांत पवार यांनी आभार मानले.

यांना झाले लाभाचे वितरण

आमदार कडू व मान्यवरांच्या हस्ते लाभाचे वितरण झाले. गोविंदा पाटील, योगेश पाटील, रत्नाबाई भासले, दशरथ राठोड, प्रमोद महाले, मंदाकिनी गायकवाड, गंगुबाई गिरासे, गणेश बडगुजर, संतोष मोरे, विजय बागूल, पंढरीनाथ सोनवणे, राष्ट्रीय खेळाडू दर्शना गवते, राहुल बैसाणे, विद्यार्थी साई गिरवरलकर, हर्ष जाधव, सुरेश अमृतकर, प्रतिभा पाठक, मंगलसिंग पवार, दीपक पहाडे, सिमरन शेख, रतिलाल चौरे, संजय पाटील, रोजश नेरकर, नील पाटील, सुरेखा चौधरी, कैलास पाटील, शामली रोकडे, नितीन पाटील, सचिन चौधरी, हिलाल माळी, चंद्रमुनी शिंदे, सिद्धार्थ शिंदे, हर्षाली महाले, हिरामण थोरात, बबलू ढोमले, झिपा केदार यांना

विविध योजनांतर्गत बीज-खेळते भांडवल, आवास योजना हप्ता, संजय गांधी निराधार योजना, ई-शिधापत्रिका, धान्य, संसारोपयोगी साहित्य, शिष्यवृत्ती धनादेश, यूडीआयडी प्रमाणपत्र, गोठा, एमआयसी थेरपी, दुचाकी, दिव्यांग ५ टक्के, गायी-म्हशी, नवीन विहीर खोदकामास धनादेशाचा लाभ दिला गेला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT