Dhule News : भाजपचे नीतेश राणे यांच्या भूमिकेविषयी मला काही माहिती नाही; परंतु नाशिक परिक्षेत्रातील उच्चपदस्थ पोलिस अधिकाऱ्यांच्या दबावामुळे माझ्याविरोधात येथील सहा महिन्यांपूर्वीच्या टिपू सुलतान स्मारक प्रकरणी दाखल गुन्ह्यात वाढीव कलमे लावण्यात आल्याचा आरोप एमआयएमचे आमदार फारूक शाह यांनी शनिवारी (ता. २८) केला. तसेच हा प्रकार म्हणजे भाजपकडून शिळ्या कढीला ऊत असल्याची टीकाही त्यांनी केली.(MLA Shah statement of Increased clauses due to pressure from senior police officers dhule news)
देवपूरमधील विटाभट्टी परिसरातील अभ्यासिकेच्या कामाचे भूमिपूजन झाल्यावर काही पत्रकारांनी विचारणा केलेल्या विविध प्रश्नांवर आमदार शाह यांनी भूमिका मांडली.
भाजपविरोधात आरोप
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने पत्रकार परिषदेत आगामी निवडणुकीमुळे शहरात दोन नेत्यांमधील अहमहमिका व तणाव निर्माण करून अनुचित प्रकार घडविण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी भीती व्यक्त केली. त्या संदर्भात आमदार शाह म्हणाले, की ते दोन नेते कोण हे पत्रकार परिषद घेणाऱ्या पदाधिकाऱ्यास विचारावे.
भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून अनेक महिन्यांपासून शहराचे वातावरण दूषित करण्याचा, जातीय दंगल भडकविण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आमदार शाह यांनी केला. तसेच भाजपच्या पदाधिकाऱ्याकडून अतिक्रमणे काढण्याच्या मागणीचा प्रकार म्हणजे राजकारण व ती खेळी असल्याचे ते म्हणाले.
शांतता ठेवण्याचा प्रयत्न
मी शांतताप्रिय असून, सर्वांना मिळून शहर शांत ठेवायचे आहे. आमदारकीच्या कालावधीतही जातीय सलोखा राखण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे. यात कुणी खोडा घालण्याचा प्रयत्न केल्यास त्याच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली जाईल, असे आमदार शाह म्हणाले. शहरातील वाढती गुंडगिरी, अवैध व्यवसाय, नशेच्या औषधांची विक्री, गावगुंडांना पोसणाऱ्यांबाबत वेळोवेळी आयजी, गृहमंत्री, पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे.
त्याविषयी दखल न घेतल्याने विधिमंडळाच्या अधिवेशनावेळी पायरीवर बसून आंदोलन केले. मात्र, अशांची रखवालदारी करणाऱ्यांकडे चौकशी दिली गेली. भाजपचा आयजी आणि एसपींवर दबाव असल्याने गुंडांची राखण केली जात असल्याचा आरोप करत आमदार शाह यांनी याप्रश्नी हिवाळी अधिवेशनात बोलू दिले नाही तर पुन्हा आंदोलन करेन, असा इशारा पत्रकारांशी बोलताना दिला.
अभ्यासिकेचे भूमिपूजन
दरम्यान, शहरात मूलभूत सोयी-सुविधांच्या विकास योजनेंतर्गत देवपूरमधील प्रभाग तीनमध्ये विटाभट्टी येथे हाजी गुलाबनगर परिसरात अभ्यासिका साकारणाच्या कामाचे आमदार शाह यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसह इतर परीक्षांसाठी देवपूर भागात अभ्यासिका नाही.
त्यामुळे त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असावी यासाठी पाठपुराव्यातून २५ लाखांचा निधी शासनाकडून मिळविला. तिच्या कामाचे भूमिपूजन आमदार शाह यांच्या हस्ते झाले. त्यांच्या पाठपुराव्याबद्दल त्यांचे या भागातील नागरिकांनी आभार मानले.
शहरासाठी चार अभ्यासिका त्यांनी मंजूर करून घेतल्या आहेत. नगरसेवक नासीर पठाण, नगरसेवक सईद बेग, नगरसेवक गणी डॉलर, कैसर अहमद, डीसेंट मास्टर, डॉ. दीपश्री नाईक, फातेमा अन्सारी, महेमुना अन्सारी, निजाम सय्यद, हलीम शमसुद्दीन, डॉ. बापूराव पवार, आसिफ शाह, अल्ताफ पिंजारी, सुफी हाजी, फकिरा बागवान, नजर पठाण, सऊद आलम, अबरार शाह, जुबेर शेख, अकिब अली सय्यद, शहजाद मन्सुरी, अब्दुल रहीम शेख, आरिफ खान, गबा मिस्तरी, रियाज शाह, मोईन खान, साजिद शेख, हबीब अन्सारी, जावेद मिर्झा, आसिफ शेख, नईम शेख, सलमान अन्सारी, सादिक पठाण, समीर शाह, एकलाक अन्सारी, फैसल अन्सारी, नाजीम शेख आदी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर आमदार शाह यांनी भाजपसह पोलिस अधिकाऱ्यांवर आरोप, टीकेचे सत्र अवलंबिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.