तळोदा : भल्या सकाळी मधुर आवाजात ‘वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी हरिनाम बोला’ असे म्हणत लोकगीतातून हरिनामाचा गजर करीत पारंपरिक लोकगीते गाणाऱ्या आणि घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात त्यातून घरधनीसाठी व त्याच्या कुटुंबीयांसाठी परमेश्वराचे आशीर्वाद मागणाऱ्या वासुदेवाचे तळोदा परिसरात आगमन झाले आहे. वासुदेव शहरातील ठिकठिकाणी देवाचे गोडवे गात, आपली वंशपरंपरागत कला सादर करीत भिक्षुकीचा व्यवसाय करीत आहेत.
हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
पूर्वीच्या काळात दर वर्षी वासुदेव घरधनीच्या पित्तरांचे गोडवे गात प्रभुनामाची लोकगीते व त्यातून घरधनीसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी परमेश्वराचे आशीर्वाद मागत असे. संपूर्ण कुळाचा उद्धार व्हावा व दानातून पुण्यकार्य केल्याचे समाधान लाभावे, यासाठी वासुदेवाला पूर्वी घरोघरी धान्य व दक्षिणा मोठ्या प्रमाणात भेट स्वरूपात दिली जात असे. मात्र आधुनिक काळात ही संस्कृती लोप पावत चालली आहे.
ग्रामीण भागात मात्र परजिल्ह्यातून येणाऱ्या व वंशपरंपरागत हा भिक्षुकीच्या व्यवसाय करणाऱ्या वासुदेवाचे दर्शन आजही अधूनमधून होत असते. अशाच एका वासुदेवाचे दर्शन तळोदा परिसरात सध्या सर्वांना होताना दिसत आहे. अकोला जिल्ह्यातील पांडुरंग शिंदे नावाचे वासुदेव सध्या हरिनामाचे गोडवे गात, तळोदा परिसरात घरोघरी गल्लोगल्ली भिक्षुकी मागत फिरताना दिसत आहेत. ते दररोज सकाळी सहापासून ते दुपारी बारापर्यंत शहरातील गल्लोगल्ली व नवीन कॉलनी परिसरात ठिकठिकाणी देवाचे गोडवे गात भिक्षा मागण्याच्या व्यवसाय करीत आहेत.
पांडुरंग शिंदे यांचे वय आज साठ असून, वासुदेव बनून भिक्षुकीचे काम ते वयाच्या दहाव्या वर्षापासून करीत आहेत. त्यामुळे आयुष्याची सुमारे पन्नास वर्षे त्यांची वंशपरंपरागत या भिक्षुकीच्या व्यवसायात झाली आहेत. दरम्यान, वासुदेव गृहलक्ष्मीच्या हातून मिळणाऱ्या सुपातून देण्यात येणाऱ्या गहू, तांदूळ व दक्षिणारूपी थोडीफार रोख रक्कम याच्यावर समाधान मानतो व तेच दक्षिणेतून मिळालेले धान्य व पाण्याच्या कळस सुपात ठेवून स्वतःभोवती गोल रिंगण मारून फिरवितो. सुपातील धान्याचा एक कणही तसूभर इकडेतिकडे सरकत नाही अथवा तांब्यातील किंवा कळसातील पाणी डचमळतसुद्धा नाही. सुपात ठेवलेल्या कुंकवाच्या करंडातील तांदळाचा दाणादेखील तसूभर सरकत नाही असे वैशिष्ट्यपूर्ण कलेचे दर्शन या वासुदेवाकडून सध्या तळोद्यातील जनतेला होत आहे.
कलाच आमची साधना
सुपात धान्य व पानाच्या कळस, कुंकवाचा करंडा ठेवून स्वतःभोवती प्रदक्षिणा घालत असताना चक्क सूप उभे धरून प्रदक्षिणा घालत असताना सुपातले जिन्नस धान्य तसूभरही हलत नाही. यामागचे रहस्य काय, असे पांडुरंग शिंदे यांना विचारले असता त्यांनी सांगितले, की ही कला मी माझ्या आजोबांकडून शिकलेलो आहे आणि ही कलाच आमची साधना आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.