Superintendent of Police Sanjay Barkund, Additional Superintendent Kishore Kale, Deputy Superintendent Pradeep Mairale, Inspector Hemant Patil and a team were present along with the suspect in custody in the Amol Bhamre murder case. esaka
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : त्रस्त आईने मुलाचा काटा काढला; दोघे मारेकरी ‘LCB’च्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

धुळे : संसाराचा रहाटगाडा चालविण्यासाठी आई, पत्नी रोज दोनशे रुपये रोजाने काबाडकष्ट करायची आणि या पैशांवरच दारूसाठी तो डल्ला मारायचा. कुठलेही काम न करता केवळ दारूसाठी तो आई-पत्नीवर अवलंबून असायचा. पैसे देण्यास नकार दिला असता त्याने दारूच्या नशेत रॉकेल ओतून अपरात्री घर पेटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे त्रस्त आईनेच मुलाच्या खुनाची सुपारी देत काटा काढला. ‘एलसीबी’ने तपासचक्रे फिरवत काही तासांत या धक्कादायक घटनेचा उलगडा केला. (mother killed her own son amol bhamare murder case Two killers in custody of LCB Dhule Latest Crime News)

मेहेरगाव (ता. धुळे) येथील अमोल विश्‍वास भामरे (वय ३५) याचा गुरुवारी (ता. १) खून झाला. ‘एलसीबी’ने समांतर तपासात मृत अमोलची आई लताबाई आणि ज्याला खुनाची सुपारी दिली, त्या पुंडलिक भामरे याला शुक्रवारी (ता. २) अटक केली. दारूचे व्यसन आणि त्यातून मृत अमोल हा कुटुंबीयांचा छळ करत असल्याने आईने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासात उघड झाले.

गळा आवळून खून

नवलाणे गावशिवारातील इंग्लिश मीडियमच्या स्कूलच्या आवारात अमोल संशयास्पदरीत्या आढळला. त्याच्या मानेवर दोरीने फास दिल्याच्या खुणा होत्या. त्यामुळे अमोलचा खून झाल्याची तक्रार वडील विश्वास दामू भामरे यांनी सोनगीर पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या आदेशाने अमोलच्या खुनाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे (एलसीबी)कडून सुरू झाला. पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मेहेरगावमध्ये तपासचक्र फिरविले. अमोलच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती संकलित केली. काही तासांत पुंडलिक गिरधर भामरे (रा. मेहेरगाव) हा ‘एलसीबी’च्या रडावर आला.

पुंडलिक याने त्याच्या दोन साथीदारांसह अमोलला संपविल्याचा संशय ‘एलसीबी’ने व्यक्त केला. या शाखेचे पोलिस निरीक्षक पाटील यांनी पुंडलिकला ताब्यात घेत बोलते केले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने पार्टीच्या बहाण्याने ३० नोव्हेंबरला सायंकाळी सातच्या सुमारास अमोलला फोन करून मेहेरगाव बसस्थानकाजवळ बोलावले. नंतर त्याचे दोन साथीदार आणि अमोल, असे चौघे नवलाणे (ता. धुळे) गावशिवारातील इंग्लिश मीडियम स्कूलच्या आवारात पार्टीसाठी गेले. तेथे दोरीने गळा आवळून अमोलचा खून केल्याची कबुली पुंडलिकने दिली.

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

सतत कुटुंबीयांना त्रास

‘एलसीबी’ने खुनामागचे कारण जाणले. त्यात धक्कादायक माहिती समोर आली. अमोल हा रिकामटेकडा होता. आई-वडील आणि पत्नीशी सतत दारूसाठी पैशांवरून भांडायचा. या त्रासाला कंटाळून आई लताबाई हिने मुलगा अमोल याला संपविण्याची सुपारी पुंडलिक भामरे याला दिली. खुनाच्या बदल्यात लताबाईने पुंडलिकला २५ हजार देण्याचे कबूलही केले. त्यामुळे पुंडलिक भामरेने त्याच्या दोन साथीदारांसह अमोलचा गळा आवळून खून केला.

‘एलसीबी’ने लताबाई भामरे हिला ताब्यात घेतले. तिने गुन्ह्याची कबुली दिली. दोघा संशयितांना सोनगीर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. गुन्ह्यातील अन्य दोन संशयितांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस अधीक्षक प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील आणि पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT