Speaking at the groundbreaking ceremony of the Kusumba-Dondai National Highway, MP Dr. Subhash Bhamre. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: पाठपुराव्यामुळेच 276 कोटींतून राष्ट्रीय महामार्गाचे काम : खासदार डॉ. भामरे

हा महामार्ग मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या दोन राष्ट्रीय महामार्गांना छेदत जाणार असल्याने जिल्हावासीयांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत नव्हे तर त्यांच्याकडे बसून आग्रही मागणीतून जिल्ह्यातील दोन राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर केले.

त्याचेच फलित म्हणजे आज एकूण २७६ कोटी रुपये निधीतील दोंडाईचा ते मालेगाव या राष्ट्रीय महामार्गातील कुसुंबा ते दोंडाईचा या सुमारे ७६ कोटींच्या निधीतील दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन होत आहे.

हा महामार्ग मुंबई-आग्रा व नागपूर-सुरत या दोन राष्ट्रीय महामार्गांना छेदत जाणार असल्याने जिल्हावासीयांची मोठी सोय होणार असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले. (MP Dr bhamre statement National highway work from 276 crore only due to followup Dhule News)

खासदार डॉ. भामरे यांच्या हस्ते रविवारी (ता. ७) लामकानी (ता. धुळे) येथे कुसुंबा ते दोंडाईचा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० चे भूमिपूजन झाले, त्या वेळी ते बोलत होते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरती देवरे, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद जाधव, जिल्हा सरचिटणीस भाऊसाहेब देसले, भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश सहसंयोजक उत्कर्ष पाटील, किसान आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू खलाणे, तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, राम भदाणे, आशुतोष पाटील, पंचायत समिती सदस्य तुषार महाले, रितेश परदेशी, तारासिंग भिल, शंकरराव खलाणे, रावसाहेब गिरासे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर करण्याची मागणी सातत्याने लावून धरली. यामुळे श्री. गडकरी यांनी राज्यातील केवळ तीन राज्य महामार्गांचे राष्ट्रीय महामार्गांमध्ये रूपांतर केले.

यात एक लातूरचा, तर अन्य दोन राज्य महामार्ग धुळे जिल्ह्यातील आहेत. यात दोंडाईचा ते मालेगाव व सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अंकलेश्वर या महामार्गांचा समावेश आहे. याशिवाय साक्री-पिंपळनेर-नामपूर-देवळा व धुळे-सोलापूर या राज्य महामार्गांचाही राष्ट्रीय महामार्गांमध्ये समावेश केला.

यामुळे धुळे जिल्ह्यात एकूण सहा राष्ट्रीय महामार्ग झाले आहेत. कुसुंबा ते मालेगावदरम्यान २०० कोटींच्या निधीतून काँक्रिटीकरणाचे दर्जेदार काम पूर्ण झाले असून, आता कुसुंबा ते दोंडाईचा या ७६ कोटींच्या निधीतील डांबरीकरणाचे काम सुरू होत आहे.

यामुळे धुळे जिल्ह्यातील नागरिकांची दळणवळणाची मोठी सोय झाली आहे. भविष्यात डांबरीकरण झालेला या दुसरा टप्प्याचेही काँक्रिटीकरण होईल, अशी ग्वाहीही खासदार डॉ. भामरे यांनी दिली.

अक्कलपाडाचे पाणी देऊ

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की अक्कलपाडा प्रकल्पातून पिण्यासह सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी लामकानीसह परिसरातील गावांकडून होत आहे. याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल.

भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पाटील म्हणाले, की धुळे लोकसभा मतदारसंघात वर्षानुवर्षे अनेक समस्या प्रलंबित होत्या. यापूर्वीच्या खासदारांना जे करता आले नाही ते खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी करून दाखविले. भाजप तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रशांत पाकळे यांनी प्रास्ताविक केले. सागर पाकळे यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT