Mayor Pratibha Chaudhary speaking in the municipal budget meeting. Neighbors Vaishali Varade, Devidas Tekale esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Municipality News : 16 कोटींच्या ‘स्वप्नां’मुळे बजेट 939 कोटींवर! ‘बीओटी’ कॉम्प्लेक्सच्या उत्पन्नावर घमासान

सकाळ वृत्तसेवा

Dhule Municipality News : महापालिकेच्या माध्यमातून २०२३-२४ या आर्थिक वर्षात धुळेकरांना काय मिळाले, काय मिळणार आहे, हा प्रश्‍न तूर्त अलाहिदा पण महापालिकेचे वार्षिक बजेट मात्र कोट्यवधी रुपयांचे उड्डाणे घेत आहे.

चालू आर्थिक वर्षाच्या मनपा प्रशासनाच्या बजेटमध्ये स्थायी समितीने तब्बल ६३ कोटी रुपयांची वाढ केली. यात सुमारे १६ कोटींच्या नवीन तरतुदी सुचवत बुधवारी (ता. ९) महासभेने तब्बल सुमारे ९३९ कोटींच्या बजेटला अंतिम मंजुरी दिली. दरम्यान, या बजेटवर मनपातील विरोधकांसह सत्ताधारी भाजपच्याच काही सदस्यांनी फेक, फुगीर बजेट असल्याचा आरोप केला. काहींनी मात्र कौतुक केले.

विशेषतः बीओटीवरील व्यापारी संकुलांच्या भाडेवसुलीपोटी सुमारे शंभर कोटी रुपयांचे महापालिकेचे नुकसान झाल्याचा आरोप झाला. (municipal corporation Mahasabha gave final approval to budget of Rs 939 crore suggesting new provisions of Rs 16 crore dhule news)

त्यामुळे महापौरांनी चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश प्रशासनाला दिला. बजेट अंतिम करण्यासाठी महापालिकेत बुधवारी (ता. ९) विशेष महासभा झाली. महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर वैशाली वराडे, आयुक्त देवीदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, नगरसेवक, अधिकारी उपस्थित होते.

खिसामा नही दमडी...

विरोधी पक्षनेत्या कल्पना महाले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. महापौरांचा केवळ चार महिन्यांचा कार्यकाळ उरलेला आहे. त्यामुळे चार वर्षांत ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत, त्या फक्त चार महिन्यांत होणे म्हणजे केवळ धूळफेक आहे.

केवळ ७० टक्के निधी आणायचा आणि ३० टक्के महापालिकेच्या डोक्यावर ठेवायचा, असा खेळ सुरू आहे. नागरी समस्यांबाबत बजेटमध्ये कोणत्याही तरतुदीचे नियोजन नाही, ‘खिसामा नही दमडी आणि मी खास कोंबडी’ अशी या बजेटची गत असल्याची टीका सौ. महाले यांनी केली.

शंभर कोटींचे नुकसान

सत्ताधारी भाजपचे नगरसेवक नागसेन बोरसे यांनी प्रशासनासह स्थायी समितीने तुटीचा अर्थसंकल्प असताना तो शिलकीचा दाखवून दिशाभूल केल्याचा आरोप केला. यावर प्रशासनासह स्थायी समितीने यावर खुलासा करावा, अशी मागणी केली. त्यांच्या प्रश्‍नांवर आयुक्तांचीही भंबेरी उडाली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

महापौरांनीही वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. पण श्री. बोरसे यांनी आपले मुद्दे लावून धरल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये खटके उडाले. श्री. बोरसे यांनी मांडलेल्या बीओटीवरील व्यापारी संकुलांपोटी मनपाचे उत्पन्न शून्य कसे हा धागा पकडत नगरसेवक हर्षकुमार रेलन, संजय जाधव, शीतल नवले यांनीही प्रशासनाला धारेवर धरले. त्यांनी सात-आठ वर्षांत व्यापारी संकुलाचे भाडे का वसूल झाले नाही, असा प्रश्‍न केला. श्री. नवले यांनी तर मनपाचे १०० कोटींचे नुकसान झाल्याचे म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

दोषींवर गुन्हे दाखल करू

बीओटी तत्त्वावरील व्यापारी संकुलांच्या भाडेवसुलीप्रश्‍नी अधिकाऱ्यांना उत्तर देताना नाकीनऊ आले, काही अधिकाऱ्यांनी टोलवाटोलवीही केली. शेवटी महापौर चौधरी यांनी या प्रकरणी दोन आठवड्यांत अहवाल सादर करा, असा आदेश प्रशासनाला दिला. शंभर कोटींचे नुकसान झाले असेल तर कुणाला पाठीशी घालणार नाही. दोषींवर गुन्हे दाखल होतील, संबंधित संकुलातील गाळ्यांना सील ठोकेन, शासनाला पत्र देईन, असे महापौर चौधरी यांनी सांगितले.

महासभेच्या तरतुदी अशा

-नगरसेवक निधी.............................१५ लाख

-महापौर निधी...............................२.५० कोटी

-मनपा क्षेत्रातील नागरिकांचा विमा...........५० लाख

-सांस्कृतिक, जनजागृती कार्यक्रम............३० लाख

-क्रीडा स्पर्धा, महिला कुस्ती स्पर्धा...........२५ लाख

-महाआरोग्य शिबिर...........................२० लाख

-विविध भागात प्रवेशद्वार उभारणे.............तीन कोटी

-शहर सौंदर्यीकरण, भिंती रंगविणे.............एक कोटी

-चौक सुशोभीकरण............................एक कोटी

-छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा...एक कोटी

-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चबुतरा..१.२५ कोटी

-राजर्षी शाहू महाराज पुतळा चबुतरा..........एक कोटी

-स्वा. सावरकर पुतळा सुशोभीकरण..........५० लाख

-पुतळे सुशोभीकरण, चबुतरा बांधणे..........तीन कोटी

२०२३-२०२४ चे बजेट असे

-मनपा प्रशासन...८६० कोटी ३२ लाख ६४ हजार

-स्थायी समिती...९२३ कोटी सात लाख ६४ हजार

-महासभा......................अंदाजे ९३९ कोटींवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election 2024: भाजपची निवडणूकपूर्व तयारी, राज्यातील सर्व २५ हेलिकॉप्टर केले बुक! महाविकास आघाडीचा प्रचार कसा होणार?

Court Historic Verdict: देशातील अशी पहिलीच घटना... न्यायालयाने 98 जणांना सुनावली जन्मठेपेची शिक्षा! नेमकं काय घडलं होतं?

David Warner याची चेंडू छेडछाड प्रकरणातील मोठी शिक्षा रद्द; आता होणार कर्णधार?

Latest Maharashtra News Updates : मुंबई, पुण्यासह काही शहरात आज ढगाळ वातावरण; राज्यातही तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज

Nitin Gadkari: भाजपच्या दुसऱ्या यादीवर कोणाचं वर्चस्व? फडणवीस, बावनकुळे दिल्लीहून थेट गडकरींच्या घरी

SCROLL FOR NEXT