Vendors self-removal of shop materials on road in front of Civil Hospital during encroachment clearance operation esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: मंत्री येती ‘शहरा’; रस्ते श्‍वास घेती ‘मोकळा’!

सिव्हिल हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरची अतिक्रमणे मनपाने हटविली

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा, चौकांमधील अतिक्रमणांचा प्रश्‍न गेली कित्येक वर्षे कायम असून, ती कमी होण्यापेक्षा वाढतच आहेत. ज्या यंत्रणेकडून ही समस्या सोडविण्याची जबाबदारी आहे, ती धुळे महापालिका याबाबत असमर्थ ठरली आहे.

महापालिकेकडून होणारी थातुरमातुर व तात्पुरती कारवाई याला जबाबदार आहे. रविवारी (ता. ९) महापालिकेकडून मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा असलेली अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले.

अर्थात सोमवारी (ता. १०) ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री धुळ्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई झाली हे उघड आहे. (Municipality removed road encroachments in front of Civil Hospital Dhule News)

कारवाईनंतर मोकळा झालेला रस्ता.

धुळे शहरात विविध भागांतील अतिक्रमणांचा प्रश्‍न नवीन नाही. अगदी महापालिका मालकीच्या, शासकीय जागांवर अतिक्रमणे झाल्याचे प्रकार घडतात. केवळ अतिक्रमणे नव्हे तर या अतिक्रमणांद्वारे व्यावसायिक वापर करून लाखो रुपयेही कमावले जातात अशा तक्रारी नेहमीच असतात.

यावर धुळे महापालिकेकडून किती कारवाई होते हा संशोधनाचा भाग आहे. याशिवाय मुख्य रस्ते, चौकांतील अतिक्रमणांचा प्रश्‍नही गंभीर आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ, आग्रा रोड, पाचकंदीलसह इतर विविध प्रमुख रस्ते छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी, फेरीवाल्यांनी व्यापून टाकले आहेत.

सणासुदीच्या दिवसांत तर या रस्त्यांवरून चालायला जागा नसते असे चित्र असते. अगदी महापालिकेसमोरही अतिक्रमणे करून व्यवसाय थाटले जातात. अर्थात अशी अतिक्रमणे संबंधित व्यावसायिकांना महापालिकेकडून पर्यायी जागाच उपलब्ध केली जात नाही.

त्यामुळे ही स्थिती पाहायला मिळते. समस्या गंभीर बनली किंवा मोठ्या प्रमाणावर तक्रारी झाल्या किंवा काही अप्रिय घटना घडल्या की मग महापालिकेकडून पोलिसांच्या मदतीने तात्पुरती कारवाई होते.

एक-दोन दिवसांत किंवा त्याच दिवशी पुन्हा ‘जैसे थे’ स्थिती पाहायला मिळते. या समस्येला केवळ प्रशासन जबाबदार नाही तर लोकप्रतिनिधीही तेवढेच जबाबदार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंत्र्यांसाठी रस्ते मोकळे

शासन आपल्या दारी अभियानांतर्गत सोमवारी धुळे शहरात जिल्हास्तरीय कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार धुळ्यात येत आहेत.

या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. ९) दुपारी महापालिकेकडून प्रमुख रस्त्यांवरची अतिक्रमणे हटविण्यात आली.

यात साक्री रोडवरील सिव्हिल हॉस्पिटलसमोरील टपऱ्या हटवून रस्ता मोकळा करण्यात आला. हटविलेल्या अनेक टपऱ्या समोरच्या रस्त्याच्या कडेला उभ्या केल्याचे पाहायला मिळाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT