Due to the heavy rains on Sunday, water from the floodwaters entered the court premises. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शहाद्यातील पाटचाऱ्या अतिक्रमणमुक्त करा; उपविभागीय अधिकाऱ्यांचे पाटबंधारेला निर्देश

सकाळ वृत्तसेवा

शहादा : शहरात पाटचाऱ्यांवर झालेल्या अतिक्रमणामुळे मानवनिर्मित आपत्ती येऊन न्यायालयासह इतरत्र पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. पाटबंधारे विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन येत्या तीन ते चार दिवसांत डोंगरगाव रस्त्यासह इतर भागातील पाटचाऱ्यांवरील अतिक्रमण त्वरित काढावे. (Make pavement in Shahada free from encroachment Direction of Sub Divisional Officers to Irrigation)

अन्यथा पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांनी दिले. शहर परिसरात रविवारी (ता. २१) रात्री साडेआठच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे पाटचाऱ्यातील पाणी शहरात शिरले. नुसते शहरात नाही, तर न्यायालयासह इतर भागातही पाणी शिरल्याने हाहाकार उडाला.

पाटचाऱ्यांवर अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा न होता पाण्याचा प्रवाह शहरात शिरल्याने ही गंभीर परिस्थिती ओढवली. पाटचाऱ्यांवरील अतिक्रमणच या घटनेला कारणीभूत असून, यासाठी उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठकीचे आयोजन करण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या कार्यालयात सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

बैठकीतून उपविभागीय दंडाधिकारी दळवी यांनी पाटबंधारे विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी करीत पाटचाऱ्यावरील अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना व आदेश दिले. बैठकीला तहसीलदार दीपक गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार, पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, राज्य महामार्गाचे वानखेडे, नगर परिषदेचे कार्यालयप्रमुख वसावे. (latest marathi news)

नगररचना अधिकारी सूर्यवंशी, पाणीपुरवठा अभियंता प्रकाश जावरे, लिपिक गोटूलाल तावडे, पाटबंधारे विभागाचे अभियंता मयूर पाटील, बांधकाम विभागाचे अभियंता पाटील यांच्यासह विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी उपस्थित होते. श्री. दळवी म्हणाले, ‘पाटचाऱ्यांवरील अतिक्रमणामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने हे पाणी शहरात शिरले.

पाटबंधारे विभागाने कारवाई करण्यासंदर्भात वारंवार कुचराई केली आहे. परिणामी, पाटचाऱ्यांवरील अतिक्रमण वाढत गेल्याने पावसाचे पाणी न्यायालयात शिरले आहे. न्यायालयात पाणी शिरल्याने न्यायालयाने अतिक्रमण काढण्यासंदर्भात सूचना केल्या आहेत. त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. पाटबंधारे विभागाने सर्वच अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढण्यासंदर्भात कारवाई करावी.

महसूल, प्रशासन, पोलिस प्रशासन, पालिका प्रशासन पाटबंधारे विभागासोबत असतील. येत्या काही दिवसांत पाटबंधारे विभागाने अतिक्रमण संदर्भात ठोस कारवाई न केल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर शासन नियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसा अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्यात येईल, असा सक्त आदेश व सूचनाही श्री. दळवी यांनी दिल्या आहेत.

‘सकाळ’ने मांडला होता प्रश्‍न

शहाद्यातील पाटचाऱ्यांमुळे काय स्थिती निर्माण होऊ शकते, याबाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी वृत्तमालिकेद्वारे प्रशासन व पाटबंधारे विभागाला जाणीव करून दिली होती. प्रशासन आणि पाटबंधारे विभागाने तेव्हाही थातुरमातूर कारवाई केली. मात्र पाटचाऱ्यांवरील अतिक्रमणे ‘जैसे थे’च राहिली. तेव्हाच गांभीर्याने हा विषय मार्गी लागला असता, तर आज न्यायालयात पाणी शिरण्याची घटना घडली नसती. आतातरी पाटबंधारे विभाग किती गांभीर्याने अतिक्रमणांचा विषय मार्गी लावतो, याकडे आता जनतेचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT