Nandurbar Market Committee : यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच कोटी रुपयांचे ‘रेकॉर्ड ब्रेक’ उत्पन्न मिळाले आहे. त्यातून एक कोटी ६८ लाख रुपयांच्या नफा झालेला आहे. प्रथमस्थानी सर्वसामान्य शेतकरीहित लक्षात घेऊन घेतलेले निर्णय आणि शेतमजूर, संचालक मंडळ, अधिकारी कर्मचारी तसेच व्यापारी त्यांच्या सहकार्यातून झालेल्या भरभराटीबद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी संचालक मंडळाचा सत्कार केला. ( 1 Crore profit to Agricultural Produce Market Committee )
खानदेशातून नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीत कृषिमालांची मोठ्या प्रमाणावर आवक होते. मिरची, कांदा, कापूस, धान्य, भाजीपाला खरेदी-विक्रीतून बाजार समितीला फायदा झालेला आहे. १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ अखेर पाच कोटी ३६ लाख ५४ हजार १९३ रुपयांचे विक्रमी उत्पादन मिळाले. त्यातून तीन कोटी ६७ लाख ८६ हजार ७६३ रुपये खर्च झाला असून, एक कोटी ६८ लाख ६७ हजार ४३० रुपये घसघशीत नफा मिळालेला आहे.
आर्थिक भरभराटीबद्दल शिवसेनेचे नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सभापती विक्रमसिंह वळवी, उपसभापती वर्षा पाटील, सचिव योगेश अमृतकर व संचालक मंडळाच्या आमदार कार्यालयात सत्कार केला.
या वेळी शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे, संचालक नवीन बिर्ला, दीपक मराठे, किशोर पाटील, गोपीचंद पवार, लकडू चौरे, गिरीश जैन, ठाणसिंग गिरासे, प्रकाश माळी, विजय माळी, राजेश गावित, गजानन पाटील, दिगंबर जाधव आदी उपस्थित होते.
कांदा, मिरचीतून उत्पन्न
परिसरात कांदा व मिरची अन्य मालाचे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांकडून उत्पादन घेण्यात आल्यामुळे बाजार समितीत दररोज शेतमालाची मोठ्या प्रमाणावर आवक होत होती. त्याचा परिणाम म्हणून घसघशीत उत्पन्न मिळाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात आले.
''मागील काही काळ सोडला तर गेल्या अनेक वर्षांपासून कृषी उत्पन्न बाजार समितीत आमच्या गटाची सत्ता आहे. संचालक मंडळाचे सुयोग्य नियोजन, काटकसर, शेतकरीहिताचे घेतलेले निर्णय व शेतमजूर, हमाल-मापाडी, व्यापाऱ्यांच्या सहकार्यातून बाजार समितीला ‘अच्छे दिन’ आलेले आहेत.''-चंद्रकांत रघुवंशी, शिवसेना नेते, नंदुरबार
असे मिळाले उत्पन्न
-बाजार फी- ३ कोटी ७५ लाख ४९ हजार २१५.७५
-भांडवली उत्पन्न- ८६ लाख ६५ हजार ११२.१२
-अनुज्ञप्ती फी- २९ हजार ५४५
-इतर उत्पन्न- २८ लाख ३८ हजार ६६१.४८
-जनावरे इतर फी- १४ हजार ६२६.५०
-गुंतवणुकीवरील उत्पन्न- ४५ लाख ४७ हजार ६३
असा झाला खर्च
-एकूण खर्च- ३ कोटी ६७ लाख ८६ हजार ७६३
-नफा- एक कोटी ६८ लाख ८७ हजार ३००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.