MLA Rajesh Padvi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शहादा-तळोदा विकासकामांसाठी 10 कोटी; आमदार राजेश पाडवी यांच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर

नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत शहादा पालिकेकरिता पाच कोटी ४० लाख, तसेच तळोदा नगर परिषदेकरिता चार कोटी ६० लाख रुपये, असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : राज्य शासनाने नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजनेंतर्गत शहादा पालिकेकरिता पाच कोटी ४० लाख, तसेच तळोदा नगर परिषदेकरिता चार कोटी ६० लाख रुपये, असा एकूण दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, लवकरच या निधीतून विविध समाजांचे सभामंडप, समाजभवन व इतर विकासकामे केली जाणार आहे, अशी माहिती आमदार राजेश पाडवी यांनी दिली. (Nandurbar 10 crore for Shahada Taloda development works)

राज्य शासनाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच पार पडले. या अर्थसंकल्पादरम्यान शहादा विधानसभा मतदारसंघातील शहादा व तळोदा या दोन्ही पालिकांतर्गत विविध विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार राजेश पाडवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अजित पवार यांच्याकडे केली होती.

या मागणीला राज्य शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही पालिकांसाठी दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून शहादा पालिका हद्दीतील रामनगर येथील श्रीराम मंदिराचा सभामंडप बांधकाम करणे, मलोणी येथे श्रीराम चौक येथे सभामंडप बांधकाम करणे, गुरव समाज भवन बांधकाम करणे, चर्मकार समाज भवन बांधकाम करणे,

सिद्धिविनायक मंदिर येथे सभामंडप बांधकाम करणे, गोविंदनगर येथे आयडीबीआय बँकेसमोर खुल्या जागेत सभागृह बांधकाम करणे, भावसार समाज मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकाम करणे या कामांसाठी प्रत्येकी ३० लाख रुपये, जांगीड समाज भवन बांधकाम करणे, भोई समाज भवन येथे संरक्षण भिंत बांधकाम करणे, प्रभाग क्रमांक १२ मधील जितू भोई यांच्या घरापासून ते अनिल मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण करणे.

प्रभाग क्रमांक १० मधील हेमंत मराठे यांच्या घरापासून ते भामरे स्कूलपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, प्रभाग क्रमांक ८ मधील दीपक सोनवणे यांच्या घरापासून ते वेडू नकसरे यांच्या घरापर्यंत गटार तयार करणे, प्रभाग क्रमांक १३ मधील श्रीकृष्ण कॉलनीअंतर्गत रस्ते तयार करणे या विकासकामांसाठी प्रत्येकी २० लाख रुपये, प्रभाग क्रमांक ६ मधील ए. के. पाटील यांच्या घरापासून ते पी. व्ही. पाटील यांच्या घरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे ६० लाख रुपये.

तसेच प्रभाग १३ मधील सर्व्हे नंबर ८५/१, ८५/२ व ८५/३, तसेच ८४+९०+९३/१अ व ८४ +९०+९३/१व दीनदयाळनगर अंतर्गत रस्ते डांबरीकण करणे, एक कोटी ५० लाख रुपये असा एकूण पाच कोटी चाळीस लाख रुपये, तसेच तळोदा नगर परिषद हद्दीतील निम हट्टी येथील शेठ के. डी हायस्कूलसमोर लादीकरण करणे- ४० लाख रुपये, प्रधान हट्टी येथे सभामंडप बांधकाम करणे.

कलाल समाज भवन येथे वॉल कंपाउंड बांधकाम करणे, शिंपी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, भोई समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, मराठा समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, कुंभार समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, तांबोळी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे.

गुरव समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, सुतार समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, जोहरी समाज सभागृह/सभामंडप बांधकाम करणे, मेहतर समाज सभागृह / सभामंडप बांधकाम करणे प्रत्येकी ३० लाख रुपये, प्रधान हट्टी येथे बंद गटार बांधकाम करणे- २० लाख रुपये, माळी समाज मंगल कार्यालय येथे सभामंडप बांधकाम करणे ७० लाख रुपये, असा एकूण चार कोटी साठ लाख रुपये निधी प्राप्त झाला आहे.

राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेल्या या निधीतून दोन्ही पालिकांतर्गत लवकरच निविदाप्रक्रिया व इतर तांत्रिक बाबी पार पाडून प्रत्यक्ष कामाला सुरवात केली जाणार असल्याची माहिती आमदार राजेश पाडवी यांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT