नंदुरबार : जिल्ह्यात रविवारी (ता. १८) पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) ३७ केंद्रांवर, तसेच पूर्वमाध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (आठवी) २९ केंद्रांवर सुरळीत पार पडली. यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी (Scholarship Exam) पाच हजार १०८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी चार हजार ९९ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. (Nandurbar scholarship exam marathi news )
जिल्ह्यात रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा-२०२४ चे आयोजन करण्यात आले होते. त्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठ पाच हजार ३१७ विद्यार्थी प्रविष्ट झाले. त्यांपैकी पहिल्या पेपरसाठी पाच हजार १०८ विद्यार्थी उपस्थित होते व २०९ विद्यार्थी अनुपस्थित होते. दुसऱ्या पेपरसाठी पाच हजार १०१ विद्यार्थी उपस्थित होते व २१६ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा जिल्ह्यातील २९ केंद्रांवर झाली. त्यासाठी चार हजार २४८ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यांपैकी पहिल्या पेपरसाठी चार हजार ९९ विद्यार्थी उपस्थित होते. १४९ विद्यार्थी अनुपस्थित होते. दुसऱ्या पेपरसाठी चार हजार १०१ विद्यार्थी उपस्थित होते. १४७ विद्यार्थ्यांनी दांडी मारली.
नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत परीक्षा केंद्र होते. याकामी स्वतंत्र पथक नेमणूक करण्यात आले होते. भरारी पथकात नंदुरबार तालुक्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, नवापूर तालुक्यासाठी उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, शहादासाठी उपशिक्षणाधिकारी नीलेश लोहकरे, तळोदा- उपशिक्षणाधिकारी वंदना वळवी, अक्कलकुवा तालुका माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे, धडगाव तालुक्यासाठी उपशिक्षणाधिकारी (योजना) भावेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली होती. (Latest Marathi News)
प्रत्येक केंद्रावर केंद्रप्रमुख तसेच विस्ताराधिकारी यांना परीक्षेचे कामकाज नसेल अशा सर्वांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथक म्हणून संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी नेमणूक दिली होती. सर्व नेमणूक देऊन जी परीक्षा केंद्रे बाकी होती अशा ठिकाणी पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांना बैठे पथक म्हणून नेमणूक देण्यात आली.
परीक्षा यशस्वीपणे पार पडली असून, याकामी शिक्षणाधिकारी सतीश चौधरी, परिरक्षक नीलेश लोहकरे, परीक्षा समन्वयक डॉ. युनूस पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, समन्वयक विस्ताराधिकारी, परीक्षा केंद्रसंचालक, जिल्हा कार्यालयाचे योगेश रघुवंशी, आसिफ पठाण, प्रशांत पवार यांनी परिश्रम घेतले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.