Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : वेगवेगळ्या चोऱ्यांतील अल्पवयीनासह 8 जणांना अटक; 6 गुन्ह्यांची उकल

Nandurbar Crime : जिल्ह्यातील चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील संशयित एका अल्पवयीन मुलासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : जिल्ह्यातील चोरीच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांतील संशयित एका अल्पवयीन मुलासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जिल्ह्यातील सहा गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांच्याकडून ४२ तोळे सोने, सव्वा किलो चांदीच्या दागिन्यांसह १९ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवण दत्त एस. यांनी गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील विविध पोलिस ठाणे हद्दीत दाखल गुन्ह्यांचा आढावा घेतला असता, मालमत्तेविरुद्धचे अनेक गंभीर गुन्हे दाखल असून ते अद्यापही उघडकीस आलेले नाहीत. ( 8 people arrested including minor in different thefts )

त्याअनुषंगाने गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करून गुन्ह्यातील सक्रिय गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाईबाबत बैठकीत सर्व पोलिस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यातील गंभीर गुन्ह्यांची इत्थंभूत माहिती घेत रेकॉर्डवरील, जेलमधून सुटलेले गुन्हेगार तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या सिमेस लागून गुजरात व मध्य प्रदेशातील संशयितांचा शोध घेतला.

त्या दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास एकता नगर परिसरात अल्पवयीन मुलाने साथीदारासह शहादा, तळोदा व नंदुरबार शहर परिसरात घरफोडी केल्याची माहिती मिळाली. अल्पवयीनास ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता त्याने मध्य प्रदेशातील साथीदारांनी मिळून शहादा व तळोदा परिसरात घरफोडीचे गुन्हे केल्याचे सांगितले.

त्यानुसार पथकाने मध्य प्रदेशात जात राहुलसिंग मोतीसिंग भाटिया (वय २५, रा. आसवाडा ता. पानसेमल जि. बडवानी) यास व नंदुरबार शहरातील पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी) (वय २२, रा. एकता नगर, नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी व त्यांचे इतर साथीदार मिळून शहादा पोलिस ठाणे येथे दाखल व तळोदा पोलिस ठाणे येथे दाखल प्रमाणे गुन्ह्याची कबुली दिली.

आरोपींकडून शहादा पोलिस ठाणे येथे दाखल गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी १० लाख ८० हजार रुपये किमतीचे २७ तोळे सोने व ८० हजार रुपये किमतीचे १ किलो चांदी असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच तळोदा पोलिस ठाणे येथे गुन्ह्यात आरोपी पवन ऊर्फ शरद अरुण चव्हाण (गोंधळी) कडून चोरीस गेलेले ५ लाख ८० हजार ३५३ रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने व मुद्देमाल हस्तगत केला आहे. आरोपीस तळोदा पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

संजय हिरालाल सोनी (रा. प्लॉट नंबर १६, महावीर कॉलनी, नंदुरबार) यांच्या घराच्या कंपाउंडच्या भिंतीवरून उडी मारुन चोरीच्या उद्देशाने दिनांक २६/०५/२०२४ रोजी घरात प्रवेश करून सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याचे नुकसान गुन्ह्यातील सीसीटिव्ही फुटेज स्थानिक गुन्हे शाखेने पाहिले असता संशयित हा नंदुरबार शहरातीलच सराईत गुन्हेगार असल्याचे समजून आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रशेखर नथ्थु मेश्राम (वय-२६, रा. चिंचपाडा भिलाटी, नंदुरबार) यास उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

तसेच १६/०५/२०२४ रोजी वेळावद ते उमर्दे गाव फाट्यादरम्यान रोडवर दीपक प्रितमदास हसाणी (वय ४५, रा. प्लॉट नं. २० मंगलमूर्ती नगर, नंदुरबार) हे नंदुरबारला जाताना दोन दुचाकीस्वारांनी लाथ मारुन खाली पाडत लाल रंगाची पिशवी व त्यातील अंदाजे ४५ हजार रुपये हे जबरीने हिसकावून चोरुन पळून गेले होते. याबाबत उपनगर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल असून त्याच्या समांतर तपासात गुप्त माहितीनुसार, हा गुन्हा देविदास पवार (रा. नारायणपूर, ता.जि. नंदुरबार) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केल्याबाबत माहिती मिळाली.

त्यानुसार पथक तयार करून पथकाने नारायणपूर येथे जाऊन देविदास पवार यास ताब्यात घेतले. त्याने हा गुन्हा त्याच्या इतर ५ ते ६ साथीदारांच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानुसार त्याचे साथीदार मनीष दिलीप वसावे (वय २२), रोहित विष्णू वसावे (वय २१, दोघे रा. धानोरा ता.जि. नंदुरबार) व हितेश राजेंद्र पाडवी (वय २२), निखिल सुनील वळवी (वय २२, दोन्ही रा. कोठली ता.जि. नंदुरबार) यांना ताब्यात घेतले. त्यांनी कबुली दिली. आरोपींकडून ११ हजार ५०० रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी हस्तगत केल्या असून आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी उपनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

बुलडाणा येथील चोरी उघडकीस

ताब्यात घेतलेल्या अल्पवयीनासह त्याच्या साथीदारांनी बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे एकाच रात्री ७ ठिकाणी घरफोडी केल्या होत्या. त्याबाबत खामगाव शहर पोलिस ठाणे जिल्हा बुलडाणा येथे गुन्हा दाखल आहे. या घटनेतील सीसीटिव्ही फुटेज स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाल्यानंतर पोलिस अंमलदार अभय राजपूत यांनी फुटेजमधील आरोपींना ओळखून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगितले.

त्यांनी पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस. सोबत चर्चा करून बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहर पोलिस ठाण्याचे तपासी अधिकारी यांना कळविले. त्यावरुन खामगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने नंदुरबार शहरातील एका अल्पवयीन मुलास ताब्यात घेत त्याच्याकडून २ लाख ४६ हजार ७०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने हस्तगत करून अल्पवयीन मुलास खामगाव शहर यांच्या ताब्यात दिले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: जिल्हा परिषद भरतीमध्ये घोळ? 19 नोव्हेंबरपर्यंत स्पष्टीकरण सादर करण्याचे कोर्टाचे आदेश

इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या ८७२ कर्मचाऱ्यांना नोटिसा! प्रशिक्षणालाही दांडी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काढली यादी; आता दाखल होणार गुन्हे अन्‌ शिस्तभंगाची कारवाई

Latest Maharashtra News Updates : गृह मतदान मोहिमत ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांनी बजावला मतदानाचा हक्क

Mumbai School : मुंबईत शाळा-महाविद्यालयांना तीन दिवस सुट्टी, काय आहे कारण? घ्या जाणून!

Sakal Podcast: जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान १२ तासांचा ब्लॉक ते विम्याचे पैसे लाटण्यासाठी युवक बनले अस्वल

SCROLL FOR NEXT