National Highway (file photo) esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्ग कामाला गती; चौपदरीकरणासाठी जमीन अधिग्रहणाची अधिसूचना प्रसिद्ध

Nandurbar : राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील १६३ गावांतील जमीन अधिग्रहण करण्याची अधिसूचना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामासाठी महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेशातील १६३ गावांतील जमीन अधिग्रहण करण्याची अधिसूचना रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी तिन्ही राज्यांतील सक्षम प्राधिकाऱ्यांचीदेखील नेमणूक करण्यात आली आहे. यात तळोदा तालुक्यातील दहा व शहादा तालुक्यातील २८ गावांचा समावेश आहे. त्यामुळे अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाच्या कामाला गती मिळणार आहे. (Nandurbar Acceleration for quadruple work of Ankleshwar Barhanpur National Highway)

बहुप्रतीक्षित अंकलेश्वर-बऱ्हाणपूर महामार्गाचे चौपदरीकरण करण्याची मागणी तिन्ही राज्यांतील नागरिकांनी वेळोवेळी केली आहे. त्यासाठी संसदेतदेखील हा प्रश्न मांडण्यात आला होता. त्यात केंद्र सरकारच्या राष्ट्रीय राजमार्ग विभागाने एनएच ७५३ बीई नावाने या महामार्गाला मंजुरी देऊन चौपदरीकरण करण्याची मागणी मंजूर केली होती. त्यासाठी गुजरात महाराष्ट्र, मध्य प्रदेशातून जाणाऱ्या या महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याची गरज होती.

जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया व्हावी म्हणून केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने २९ फेब्रुवारीला अधिसूचना जारी केली आहे. त्यात गुजरातमधील सात, तसेच महाराष्ट्रातील तळोदा तालुक्यातील दहा गावे काजीपूर, तलावडी, भवर, आमलाड, तळवे, मोरवड, दसवड, तळोदा, तळोदा ग्रामीण, तळोदा शहरी, तळवे मोरवड या गाव शिवारांमधील जमिनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे.

यात शहादा तालुक्यातील २८, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील ४०, जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील २४, यावल तालुक्यातील २३, रावेर तालुक्यातील २३, मुक्ताईनगर तालुक्यातील पाच व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरमधील तीन गावांचा समावेश आहे.

त्यामुळे आता अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याने महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला गती मिळणार आहे. जमीन अधिग्रहण करण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी स्तरावरील अधिकाऱ्यांची सक्षम प्राधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहण कामाला गती मिळणार आहे.

चौपदरीकरण मैलाचा दगड

सध्याचा शहादा-तळोदा-अक्कलकुवा रस्त्याच्या उत्तरेकडून व काही ठिकाणी आहे त्याच रस्त्याचा वापर करून या महामार्गाचे चौपदरीकरण होण्याची शक्यता या अधिसूचनेमुळे निर्माण झाली आहे. त्यात हा चौपदरीकरण महामार्ग काजीपूर गावाच्याही उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तळोदा शहराला हा महामार्ग पूर्णपणे बायपास करून निघणार आहे. त्यामुळे शहरवाढीसाठी व विकासाचे प्रकल्प येण्यासाठीदेखील महामार्गाचे चौपदरीकरण मैलाचा दगड ठरू शकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : काँग्रेसमध्ये इंग्रजांचे ‘जिन्स’, पक्षाकडून जात, भाषेवरून देशात फूट : योगी आदित्यनाथ

Women’s Asian Champions Trophy: गतविजेत्या भारतीय महिला संघाचे घवघवीत यश; जपानवर मात करत गाठलं अव्वल स्थान

Priyanka Gandhi : भाजप सरकारचा महाराष्ट्राशी भेदभाव! प्रियांका गांधी यांचे गडचिरोलीतील सभेत टीकास्त्र

Sakal Podcast: मध्यमवर्गीयांना अच्छे दिन येणार ते पीएम मोदींना मिळाला 'ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ नायजर' पुरस्कार

Baramati Assembly constituency 2024 : बारामतीच्या सांगता सभांकडे राज्याचे लक्ष..!

SCROLL FOR NEXT