Nandurbar News : मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत हिरिरीने सहभाग घेतलेल्या शाळांनाच मूल्यमापनाच्या वेळी गुण प्रदर्शित करून आततायीपणा करणाऱ्या मूल्यमापन समितीतील अधिकाऱ्यांनी नंतर ऑनलाइन गुणांमध्ये पार्सिलिटी केलीच कशी, असा प्रश्न आता सध्या उपस्थित केला जात असून, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शाळेतील गुणात्मक दर्जा वाढविण्यासाठी मुख्यमंत्री माझी शाळा हा स्तुत्य उपक्रम राबविला असला तरी नंदुरबार जिल्ह्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पार्सिलिटीमुळे ही स्पर्धा बदनाम झाले आहे. (partiality in evaluation marks of schools)
ज्या वेळेस स्पर्धेतील शाळांमध्ये मूल्यमापन समितीने भेट दिली त्या वेळी समितीतील अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना तुम्हाला एवढे गुण मिळाले, असे सांगून एका फॉरमॅटमध्ये ते गुण भरून मुख्याध्यापकांची सही घेतली. म्हणजेच मुख्याध्यापकांना उघडपणे त्यांना मिळालेले गुण सांगण्यात आले.
असे असतानासुद्धा तेच गुण ऑनलाइन पद्धतीने भरताना कमी कसे झाले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ज्या शाळांमध्ये मूल्यमापनासाठी गेले त्या वेळेस मुख्याध्यापकांना गुण सांगितल्यानंतर त्यांच्या अशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यांना आपण स्पर्धेत नक्कीच बाजी मारू, अशी अपेक्षा होती.
असे असताना स्पर्धेच्या निकालापूर्वीच गुणदानातील गैरप्रकार समोर येऊन अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे पार्सिलिटी केल्याचे बोलले जात आहे. समितीतील मूल्यमापन करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात शिक्षण क्षेत्रातील अशा अत्यंत चांगल्या स्पर्धांना काळे फासले जाणार नाही.
गुण कसे बदलले आम्हाला माहितीच नाही
दरम्यान, शाळांवर मूल्यमापनासाठी गेलेल्या समितीतील काही अधिकाऱ्यांना नाराज असलेल्या काही शाळांनी ‘गुड फेअर’मध्ये विचारले असता आम्हाला तर माहीतच नाही तुमचे ऑनलाइन गुण कसे काय बदलले, ते वरिष्ठांनाच माहीत, असे उत्तर देण्यात आले आहे. त्यामुळे समितीतील अधिकारी जबाबदार का वरिष्ठ अधिकारी जबाबदार, याबाबतही आता एकमेकांवर ताशेरे ओढले जात आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांची कानउघाडणी
याप्रकरणी काही शाळांतर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुप्रिया गावित यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. गावित यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलावून याबाबत विचारणा केली असता, उत्तर देतानाही ते चलबिचल झाले. त्यामुळे त्यांना अक्षरशा ‘गेट आऊट’ अशा शब्दांत कानउघाडणी करण्यात आल्याने चर्चा रंगली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.