Officers and staff with timber stocks seized by the Forest Department. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime : विसरवाडीजवळ लाकूड साठा पकडला; वनविभागाच्या पथकाची कारवाई, 19 लाखांचा मुद्देमाल जप्त

Nandurbar Crime : चिंचपाडा व नवापूर वनक्षेत्रपालच्या गस्ती पथकाने विसरवाडीजवळ गुजरातमधून येणारा लाकूडसाठा जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : चिंचपाडा व नवापूर वनक्षेत्रपालच्या गस्ती पथकाने विसरवाडीजवळ गुजरातमधून येणारा लाकूडसाठा जप्त केला. वाहनात अवैध खैर लाकूड मिळून आले असून, १९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार प्रादेशिकच्या सहाय्यक वनसंरक्षकांना मिळालेल्या माहितीवरून चिंचपाड्याचे वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी व रेंज स्टाफ स्नेहल अवसरमल यांच्यासह पथक विसरवाडीजवळ रात्री गस्त घालत होते. (Action of forest department team caught wood stock near Visarwadi seized 19 lakhs worth of goods)

पहाटेच्या सुमारास विसरवाडीजवळ गुजरातमधून आलेल्या वाहनाची (एमएच-१५-बीजे-४७०७) तपासणी केली असता सदर वाहनात खैर लाकूड मिळून आले. सदर वाहन जप्त करून नवापूर शासकीय विक्री आगारात जमा करण्यात आले. धुळ्याचे वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे विभागीय वनाधिकारी दक्षता विभाग आर. आर. सदगीर, सहाय्यक वनसंरक्षक धनंजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल स्नेहल अवसरमल व मंगेश चौधरी नेतृत्वाखाली वनपाल संजय बडगुजर, वनरक्षक सतीश पदमर, कमलेश वसावे, तुषार नांद्रे यांनी सदर कारवाई केली. वनपाल तथा तपास अधिकारी शितल तोरवणे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT