Gowal Padavi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Lok Sabha Analysis : ॲड. पाडवींच्या विजयात साक्री तालुक्याचा सिंहाचा वाटा

Lok Sabha Analysis : डॉ. हीना गावित यांचा पराभव करत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर फडकावला.

धनंजय सोनवणे

Nandurbar Lok Sabha Analysis : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार ॲड. गोवाल पाडवी यांनी गेली दोन टर्म खासदार असणाऱ्या डॉ. हीना गावित यांचा पराभव करत पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर फडकावला. त्यांच्या या ऐतिहासिक विजयात साक्री तालुक्याचादेखील सिंहाचा वाटा राहिला असून, तब्बल ५० हजारांहून अधिकची आघाडी साक्री तालुक्यातून ॲड. पाडवी यांना मिळाल्याने त्यांचा विजय सुखर होण्यास मोठी मदत झाली. ( defeating dr Heena Gavit Congress flag was once again hoisted on Nandurbar )

गेल्या निवडणुकीत दहा हजारांची आघाडी काँग्रेस उमेदवारास देणाऱ्या साक्री तालुक्यातून या वेळी त्यात विक्रमी वाढ झाल्याने साक्री तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले. लोकसभा निवडणूक अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार डॉ. हीना गावित यांना सलग तिसऱ्यांदा उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसने नवख्या ॲड. गोवाल पाडवी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते.

गेली दोन टर्म खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या डॉ. गावित यांचा गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघातील संपर्क मोठ्या प्रमाणात कमी झाला होता. विशेषता साक्री तालुक्यात तर हा संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती होती. केवळ बोटावर मोजण्याइतक्या लोकांव्यतिरिक्त त्या सर्वसामान्य लोकांना वेळ देत नसल्याने त्यांच्याविषयी मोठी नाराजी दिसून आली. गेल्या दोन निवडणुकांतील विजयामुळे निर्माण झालेली अँटी इन्कमबन्सी, तालुक्याच्या रखडलेल्या विकासाचा प्रश्न, वाढती बेरोजगारी, महागाई यामुळे त्यांच्यावरील रोष अधिकच वाढत गेला.

अशातच निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये कांदा पिकाच्या दरासह शेतमालाच्या दरांमुळे तीव्र नाराजी दिसून आल्याने याचा मोठा फटका डॉ. गावित यांना बसला. दुसरीकडे काँग्रेसच्या ॲड. पाडवी यांच्याबद्दलची ‘कोण गोवाल पाडवी’ अशी चर्चा कालांतराने त्यांनी बदलत मोठे आव्हान निवडणुकीत उभे केले. लोकांनीदेखील या निवडणुकीत ॲड. पाडवी यांना पाठबळ दिल्याने त्यांचा हा विजय सुकर होण्यास मदत झाली. (latest marathi news)

भाजपमधील दुफळी पथ्यावर...

साक्री तालुक्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नेत्यांची मांदियाळी दिसून येते; परंतु वर्चस्वाच्या स्पर्धेतून या नेत्यांमध्ये असणाऱ्या गटातटाच्या राजकारणाने निवडणूक प्रचारात मोठ्या प्रमाणात दुफळी दिसून आली. प्रचारादरम्यान भाजपच्याच दोन गटांत मुद्द्यांची लढाई थेट गुद्द्यांपर्यंतदेखील जाऊन पोचल्याने याचा मोठा फटका निवडणुकीत बसल्याचे दिसून आले आहे.

दुसरीकडे काँग्रेससह महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने प्रचारात आघाडी घेतल्याने याचा मोठा फायदा ॲड. पाडवी यांना झाल्याचे निकालातून स्पष्ट होतेय. तसेच भाजपतील दुफळीदेखील ॲड. गोवाल पाडवी यांच्या पथ्यावर पडल्याने त्यांना तालुक्यातून दणदणीत मताधिक्य मिळवून देण्यात मदत झाली.

याशिवाय महायुतीमधील घटकपक्षांतील काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनीदेखील काँग्रेसच्या ॲड. पाडवी यांना मदत केल्याने याचादेखील मोठा फायदा त्यांना झाल्याचे निकालातून दिसून आले आहे. एकूणच डॉ. हीना गावित यांच्यावरील नाराजी, महायुतीची विस्कळित प्रचारयंत्रणा, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांसोबतच अनेक अदृश्य हातांनी केलेली मदत यामुळे ॲड. गोवाल पाडवी यांना तालुक्यातून पन्नास हजारांहून अधिकचे मताधिक्य मिळण्यास मदत झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Maharashtra Assembly Election 2024 : निवडणुकीमुळे राज्यातील शाळांना तीन दिवस सुट्टी

Reliance And Diseny: अखेर झाली घोषणा! रिलायन्स-डिस्ने आले एकत्र; 70,352 कोटींचं जॉईन्ट व्हेंचर; नीता अंबानींवर अध्यपदाची जबाबदारी

Sports Bulletin 14th November: एकाच मॅचमध्ये दोघांची त्रिशतकं, गोव्याचा ऐतिहासिक विजय ते चॅम्पियन्स ट्रॉफी अपडेट्स

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT