Laborers while cultivating chillies by adopting technology like mulching paper. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Agriculture News : तळोद्यात शेतकऱ्यांचा मिरची लागवडीकडे कल; पाणी बचतीसाठी ठिबक सिंचन

Nandurbar Agriculture : मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतकऱ्यांकडून मिरचीची लागवड करण्यात येत आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Agriculture News : तळोदा शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ठिबक सिंचन व मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करीत शेतकऱ्यांकडून मिरचीची लागवड करण्यात येत आहे. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मिरचीचे उत्पन्न चांगले येत असल्याने आणि गेल्या काही वर्षांपासून मिरचीला चांगला भावही मिळत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे यंदादेखील तळोदा तालुक्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. (Tendency of farmers towards chilli cultivation in Taloda )

तळोद्यातील शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबत शेतात विविध प्रयोग करून फळांसोबत चांगला मोबदला देणाऱ्या पिकांना पसंती देत आहेत. मिरचीला चांगला भाव मिळत असल्याने शहरासह तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, रोझवा पुनर्वसन परिसरातील असंख्य शेतकऱ्यांकडून गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर मिरचीची लागवड करण्यात येत आहे.

यंदाचा खरिपातदेखील तालुक्यात सुमारे ३०० हेक्टरवर मिरचीची लागवड होणार असल्याचे सांगितले जात आहे. मिरचीची लागवड करताना शेतकरी ठिबक, मल्चिंग पेपरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मिरचीची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतीची मशागत करून ट्रॅक्टरचलित यंत्राद्वारे बेड तयार करण्यात येत आहे.

त्यानंतर ठिंबक सिंचन टाकण्यात येऊन त्यावर मल्चिंग पेपरचे आच्छादन टाकून दोन बेडमध्ये शेतकऱ्यांकडून चार ते फुटांचे अंतर ठेवण्यात आले असून, दोन रोपांमध्ये सव्वा ते दीड फुटाचे अंतर ठेवून रोपवाटिकांमधून रोपे आणून मिरची रोप लागवड करण्यात येत आहे. दरम्यान, मल्चिंग पेपरमुळे बाष्पीभवनाद्वारे उडून जाणारे पाणी पूर्णतः थांबते. त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होते. (latest marathi news)

तसेच बाष्पीभवन थांबल्यामुळे जमिनीतील क्षार वरच्या भागावर येण्याचे प्रमाण थांबते. खतांच्या वापरात बचत होते. कारण खतांच्या पाण्यात वाहून जाण्याचे प्रमाण कमी होते. जमिनीत हानिकारक सूक्ष्मजीवांच्या वाढीस अटकाव होतो. तणांच्या वाढीस प्रतिकार होतो. मल्चिंग पेपरच्या खाली सूक्ष्म वातावरणनिर्मिती होत असल्याने कार्बनडाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक असते.

त्यामुळे लाभदायक सूक्ष्मजीवांची क्रिया अधिक होते. यांसारखे मल्चिंग पेपर वापराचे फायदे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या मिरची लागवडीमुळे मिरची रोपांना मागणी वाढली आहे. स्थानिक परिसरासह जिल्ह्यातील इतर रोपवाटिकांतून रोपे आणण्यात येत असल्याचे चित्र सध्या परिसरात दिसून येत आहे.

''शेतात याअगोदर टरबूज, डांगर अशी फळपिके घेतली आहेत. मात्र सद्यःस्थितीत पाच एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली आली असून, मिरचीला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा आहे. आता चांगल्या पावसाची अपेक्षा आहे.''-विलास मराठे, मिरची उत्पादक शेतकरी, चिनोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

IND vs AUS : ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रचला इतिहास; एकत्रित ५०० विकेट्स घेणारे जगातले पहिलं गोलंदाजी युनीट

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

SCROLL FOR NEXT