Carrying a pregnant woman to the hospital in a bamboo bag through the river water as there is no road and no ambulance. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : रस्ता, रुग्णवाहिकेअभावी नदीच्या पाण्यातून बांबूच्या झोळीतून नेले गर्भवतीला!

Nandurbar News : रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकेची सेवा मिळाली नाही, दुसरीकडे भरपावसात नदीच्या पाण्यातून बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेला रुग्णालयात न्यावे लागल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकेची सेवा मिळाली नाही, दुसरीकडे भरपावसात नदीच्या पाण्यातून बांबूच्या झोळीतून गर्भवती महिलेला रुग्णालयात न्यावे लागल्याची घटना अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे. सुमित्रा वीरसिंग वसावे (वय २९) असे या महिलेचे नाव असून, त्या वेहगी बारीपाडा या पाड्यातील रहिवासी आहेत. (pregnant woman was taken from river water in bamboo bag)

नदीवरील पुलाअभावी पाण्यातून बांबूच्या झोळीतून त्यांना नेण्याची वेळ आल्याने शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या विरोधात स्थानिक नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. सुमित्रा वीरसिंग वसावे या गर्भवती आहेत. रविवारी (ता. २८) रात्री त्यांच्या पोटात दुखायला लागले. सोमवारी (ता. २९) सकाळी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. मात्र रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिकेऐवजी बांबूच्या झोळीतून महिलेला नेण्यात आले.

वाटेवरील नदीवर पूल नसल्याने चक्क पाण्यातून त्या गर्भवती महिलेला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याची वेळ तिच्या नातेवाइकांवर ओढवली. या पाड्यांमध्ये रस्त्याची अत्यंत आवश्यकता असताना याबाबत मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत वेहगी गावाच्या मुख्य रस्त्यापासून ते पाटीलपाडा, बारिपाडा असा सहा किमीचा रस्ता व त्यावर येत असलेले पूल बांधावे व परिसरातील नागरिकांची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यात यावी. यासाठी पाठपुरावा करूनही हा भाग वर्षानुवर्षे विकासापासून वंचित आहे.

स्थानिक नागरिकांचा संताप

या प्रसंगाचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करीत स्थानिक आदिवासी नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वर्षानुवर्षे या भागातून निवडून येत असलेले आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी काय करतात, असा प्रश्न करू लागले आहेत. वर्षानुवर्ष रस्ते विकासावर निधी खर्च पडत असतानाही दुर्गम भागात रस्त्यांअभावी रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा मिळत नाही. त्याऐवजी बांबूलन्स म्हणजे बांबूच्या झोळीतून रुग्णांना न्यावे लागत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. (latest marathi news)

वेहेगी पाड्याची अवस्था वाईट

वेहगी गावाच्या मुख्य रस्त्यापासून बारिपाडा, पाटीलवाडा येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नाही. या पाड्यांमध्ये किंवा तालुक्याच्या ठिकाणी येण्या- जाण्यासाठी स्थानिक नागरिकांना नदीतून मार्गस्थ व्हावे लागते. सध्या पावसाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मानवी साखळी करून पाण्यातून वाट काढत पैलतीरावर जावे लागते.

या पाड्यात जाण्या-येण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या पाड्यांमध्ये जाताना रस्त्यात मोठी दरी आहे व नदी-नाल्यामधून जावे लागते. पावसाळ्यात चार महिने इतर भागाशी संपर्क तुटतो. बारिपाडा व पाटीलपाडा येथील लोकसंख्या सहाशेच्या जवळपास असून, पावसाळ्यात रुग्णांना, गरोदर मातांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून एकमेकांचा आधार घेत नदी पार करावी लागते.

"नदीवर पूल नसल्याने रुग्ण, विद्यार्थिनींना पावसाळ्यात नदीच्या पाण्यातून वाट काढावी लागते. आदिवासी जिल्हा असताना तसेच आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभापती, अधिकारी सर्वच आदिवासी असताना आदिवासींनाच मरण यातना भोगाव्या लागतात, हे अक्कलकुवा तालुक्यातील जनतेचे दुर्भाग्य आहे." - दिलीप वळवी, स्थानिक ग्रामस्थ, वेहेगी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT