District Chief of Shiv Sena Adv. Ram Raghuvanshi esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News: नंदुरबार पंचायत समितीच्या सभापतिपदी अंजना वसावे! चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली ठरला फॉर्म्युला

Nandurbar News : सर्वांना सभापतिपदाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : पंचायत समितीच्या नूतन सभापतिपदी अंजना सुनील वसावे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार केला. सर्वांना सभापतिपदाची संधी मिळावी यासाठी शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली फॉर्म्युला ठरविण्यात आला आहे. (Nandurbar Anjana Vasave elected as Chairman)

सभापती दीपमाला भिल यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर बुधवारी नवीन सभापती निवडण्यासाठी पंचायत समितीच्या (स्व.) हेमलता वळवी सभागृहात विशेष सभा झाली. सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची वेळ होती. विहित मुदतीत धानोरा गणाच्या सदस्या अंजना वसावे यांनी दोन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

दुपारी तीनला सभापती निवडण्यासाठी विशेष सभा घेण्यात आली. सभेचे पीठाचे अधिकारी म्हणून तहसीलदार नितीन गर्जे होते. त्यांना गटविकास अधिकारी जयंत उगले यांनी सहकार्य केले. वसावे यांनी दाखल केलेल्या अर्जाची छाननी करण्यात आली असता दोन्ही अर्ज वैध ठरविण्यात आले.

निवडप्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवाराने अर्ज दाखल न केल्यामुळे वसावे सभापतिपदी बिनविरोध निवडून आल्याचे पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केले. निवड जाहीर होताच पंचायत समिती आवारात ढोल-ताशे व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या वेळी नवनियुक्त सभापती अंजना वसावे यांचा जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी सत्कार केला. (latest marathi news)

या वेळी शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी. के. पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमसिंह वळवी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश गावित, जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार, शेतकी सहकारी संघाचे संचालक सुरेश शिंत्रे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे, पंचायत समिती उपसभापती तेजस पवार, सदस्य दीपमाला भिल, माया माळसे, प्रल्हाद राठोड, कमलेश महाले, शीतल परदेशी, बेगाबाई भिल, संतोष साबळे, छाया पवार, बायजाबाई भिल, कलाबाई भिल, सुनील वसावे आदी उपस्थित होते.

केवळ सहा महिन्यांसाठी पद

सभापतिपदाचा कार्यकाळ ५ जानेवारीपर्यंत असणार आहे. त्यामुळे नवनियुक्त सभापती अंजना वसावे यांना केवळ सहा महिने मिळणार आहेत. सभापतिपदाच्या कार्यकाळ संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या संभाव्य सार्वत्रिक निवडणुका होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT