Nandurbar Tapi-Burai Project : बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या ७९३.९५ कोटी रुपयांच्या प्रथम सुधारित प्रकल्प अहवालास आज (ता. १६) शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत असलेल्या या योजनेमुळे नंदुरबार तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील दुष्काळी भागाला तसेच शिंदखेडा व साक्री मधील दुष्काळी भागाला या योजनेचा फायदा होणार आहे. (Nandurbar Approval of Rs 794 crore cost of Tapi Burai project)
या योजनेमुळे नंदुरबार तालुकयातील निंभेल, कंद्र, होळतर्फ, रनाळे, हाठमोहीदा, कोपर्डी, आसाने, खोकराळे, घोटाणे, न्याहाली, बलदाने, भादवड, मांजरे, बहयाने, शनीमांडळ, तिलाली, नलावाडे इत्यादी गावांना ४ हजार हेक्टर सिंचन क्षेत्राला तसेच शिंदखेडा व साक्री तालुक्यातील ३१०० हेक्टर सिंचन क्षेत्राला फायदा होणार आहे. या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावून विहिरीची भूजल पातळी वाढ मदत होऊन शेतकत्यांचे जीवनमान उंचावेल.
दरम्यान, शासन निर्णयात म्हटले आहे की, ७३८.४३ कोटी रुपयांच्या कामासाठी तसेच आस्थापना व अनुषंगिक खर्चासाठी रुपये ५५.५२ कोटी तरतूद आहे. सदर प्रकल्पाचे काम नियोजित वेळेत व सुधारित प्रशासकीय मान्यता तरतुदीच्या मर्यादेत पूर्ण करण्यात यावे. पाणीसाठ्याचा सिंचनाकरिता जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा व त्यानुसार कामे, निविदा प्रक्रिया करण्यात यावी.
संपूर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणीवापर संस्था स्थापन करुण सिंचन व्यवस्थापन पाणीवापर संस्थेस हस्तांतरित करावे. त्यानंतर नलिका वितरण अथवा खुला कालवा या पर्यायांपैकी किफायतशीर पर्याय कार्यकारी संचालक यांनी प्रमाणित करुन निवडावा. प्रकल्पाची कामे जून २०२७ पर्यंत व सुधारित प्रशासकीय मान्यता किमतीच्या मर्यादेत पूर्ण करण्याची दक्षता महामंडळाने घ्यावी. पाणीसाठ्याचा सिंचनाकरिता जास्तीत जास्त लाभ होईल अशाप्रकारे कामांचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात यावा व त्यानुसार कामे करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे.
तापी बुराई योजना
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना (जि. नंदुरबार) तापी पाटबंधारे विकास महामंडळ, जळगांव अंतर्गत हाटमोहिदा गावाजवळून तापी नदीतून अस्तित्वातील प्रकाशा बॅरेजच्या ऊर्ध्व बाजूमधील पूराचे पाणी उपसा करून सिंचनासाठी ४ टप्प्यात वापरण्यात येणार आहे. सदर प्रकल्प तापी खोऱ्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रातील आहे. (latest marathi news)
सदर प्रकल्पामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील ४३५१ हेक्टर व धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुका २७३४ हेक्टर असे एकूण ७०८५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे. सदर प्रकल्पामुळे नंदुरबार तालुक्यातील ४३५१ व शिंदखेडा येथील २७३४ हेक्टर असे ७०८५ हेक्टर क्षेत्र सिंचित होणार आहे.
जॅकवेल बांधून लिफ्टद्वारे उचणार पाणी
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजना प्रकल्पास ११०.१० कोटी मूळ प्रशासकीय देण्यात आली आहे. प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजनेत तापी नदीतून प्रकाशा बॅरेजेच्या ऊर्ध्व बाजूस पावसाळयात पुराचे वाहून जाणारे पाणी हाटमोहिदा गावाजवळील तापी नदीच्या डाव्या तिरावरुन इनटेक चॅनल व जॅकवेल बांधून उपसाव्दारे ४१.४७ दलघमी पाणी उचलणे प्रस्तावित आहे.
प्रकाशा-बुराई उपसा सिंचन योजनेच्या मूळ प्रशासकीय अहवालानुसार उपसा सिंचन योजनेच्या टप्पा एकमध्ये प्रकाशा बॅरेज मधून अस्तित्वातील वडवद लघुपाटबंधारे तलाव पाणी टाकणे, टप्पा क्र.२ वडवद ते ठाणेपाडा लपा तलावात पाणी टाकणे, टप्पा ३ मध्ये ठाणेपाडा ते शेवट ५६० तलावात पाणी टाकणे, टप्पा क्रमांक ४ सबलाईन ठाणेपाडा ते शनिमांडळ, शनिमांडळ ते बुराई धरण, बुराई धरण ते अमलपाडा पाणी साठविण्याचे प्रस्तावित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.