Bribe Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : जि. प. च्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना 50 हजारांची लाच स्वीकारताना अटक

Bribe Crime : नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना बुधवारी (ता. १५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : बंद पडलेल्या शाळेचे प्रमाणपत्र देण्यासाठी व्यावसायिकाकडून ५० हजारांची लाच स्वीकारताना नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना बुधवारी (ता. १५) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्यावर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Arrested while accepting bribe of 50 thousand to zp primary education officer )

नवापूर येथील व्यावसायिक तक्रारदार यांना नवापूर शहर, पालिका, मालमत्ता क्रमांक ८२६, सीटी सर्व्हे क्रमांक ६२४, पंचरत्न शॉपिंग, कॉम्प्लेक्स येथे हॉटेल नम्रता सुरू करावयाची असल्याने सदर परिसरात ७५ मीटर अंतरावर बंद पडलेली जिल्हा परिषद शाळा असल्याने उत्पादन शुल्क विभागाने परवाना देण्यास हरकत घेतली.

परंतु सदर शाळा इमारत ही जीर्ण होऊन बंद असल्याने नंदुरबार प्राथमिक शिक्षण विभागाकडून शाळा बंद असलेबाबत प्रमाणपत्र देणेसाठी, तसेच अशरफ भाई माजिदभाई लखानी अल्पसंख्याक विकास बहुउद्देशीय संस्था (नवापूर) या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माध्यमिक विद्यालय (नवापूर) शाळेची आरटीई मान्यता वर्धित करण्याचे काम करून दिल्याच्या बदल्यात बक्षीस म्हणून शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी ५० हजारांची मागणी केली.

ही लाच बुधवारी पंच व साक्षीदार यांच्या समक्ष जिल्हा परिषद कार्यालयातील दालनात स्वीकारताना पथकाने त्यांना पकडले. त्याच्याविरुद्ध लाच स्वीकारल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

Latest Maharashtra News Updates : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरू नये म्हणून केंद्राचा निर्णय

Mahadev Jankar: “मुख्यमंत्र्यानी नाही, पण पंतप्रधान नक्की होणार”; जानकरांनी व्यक्त केला विश्वास

Patanjali Owner: ना बाबा रामदेव, ना आचार्य बाळकृष्ण... 67,535 कोटी रुपयांच्या पतंजलीचा खरा मालक कोण?

Chitra Wagh: लाडकी बहीण योजना कर्नाटकाच्या गृहलक्ष्मी योजनेपेक्षा सरस, चित्रा वाघ यांचं वक्तव्य

SCROLL FOR NEXT