Businessman standing by road with a handcart of lemon juice  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Summer Heat : उन्हाची तीव्रता वाढताच लिंबू शिकंजीच्या हातगाड्यांवर गर्दी

Nandurbar Summer Heat : उन्हाची तीव्रता सध्या वाढू लागल्याने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना काहीतरी गारवा मिळेल असे पेय पिण्याची इच्छा होते.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Summer Heat : उन्हाची तीव्रता सध्या वाढू लागल्याने अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना काहीतरी गारवा मिळेल असे पेय पिण्याची इच्छा होते. त्यामुळे शहर व महामार्गावरील रस्त्यालगत लिंबू शिकंजी विकणाऱ्या विक्रेत्यांच्या हातगाड्या दिसू लागल्या आहेत. त्यांच्याकडे दुपारी बारा ते सायंकाळी पाच या वेळेत ग्राहकांची गर्दी वाढू लागली आहे. प्रत्येक वयवसाय आता सीझनेबल झाला आहे. पोटाची खळगी भरणारे लहान-मोठे व्यावसायिक आपापल्या परीने जसा ऋतू तसे व्यवसाय करून आपला संसाराचा गाडा चालवितात. (Nandurbar As summer heat increases handcart of lemon juice Shikanji are crowded)

त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात सध्या मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशमधील काही व्यावसायिक दाखल झाले आहेत. काही पाणीपुरी, भेलपुरी, तर काही जण फळांचा रस, यासोबतच उन्हाची तीव्रता लक्षात घेता काहींनी लिंबू शिकंजी विक्रीचा व्यवसाय थाटला आहे. या विक्रेत्यांना कोणतीही मोठी जागा किंवा छताची गरज भासत नाही. हे विक्रेते हातगाडीवर किंवा मोटारसायकलवर शिकंजीचा ड्रम बसेल अशी सुविधा करतात.

चालतेफिरते दुकान घेऊन ते रस्त्यावर वर्दळ असलेल्या ठिकाणी झाडाच्या सावलीत आपली हातगाडी लावून शिकंजी विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो. सध्या उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने रस्त्यारस्त्यावर या हातगाड्या नजरेस पडू लागल्या आहेत. वाटसरू या हातगाड्यांना बघून सहज थांबत आहेत. उन्हाच्या तीव्रतेपासून वाचण्यासाठी शिकंजीचा आस्वाद घेताना सर्वतोपरी दिसून येत आहेत.

आता स्थानकांचे प्रभुत्व

सुरवातीला हा व्यवसाय या परिसरात परिचित नसल्यामुळे परराज्यातील व्यावसायिक व्यवसाय करताना आढळून येत होते; परंतु आता या व्यवसायावर स्थानिक लोकांनी आपले प्रभुत्व गाजवायला सुरवात केल्याने स्थानिकांनाही या व्यवसायातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. (latest marathi news)

दर वर्षी या व्यवसायात प्रत्येकाला ५०० ते १००० रुपये रोज सहजरीत्या उपलब्ध होत होता. गेल्या वर्षी लिंबाच्या भावामध्ये वाढ झालेली असल्याने साहजिकच शिकंजी विक्रेत्यांनीही शिकंजीच्या भावामध्ये दरवाढ केली होती. एरवी १० रुपयाला मिळणारी थंडगार लिंबू शिकंजी गेल्या वर्षी पंधरा रुपयांना विकली जात होती.

या वर्षीदेखील लिंबू शिकंजीचा भाव १५ रुपये असल्याने आणि सहजरीत्या कुठेही शिकंजी उपलब्ध होत असल्याने प्रवासी तसेच वाटसरू आपसूक थांबून शिकंजीचा आस्वाद घेताना दिसून येत आहेत.

"बोरद येथील शहादा चौफुलीलगत असलेल्या रस्त्यावर दोन वर्षांपासून आपला व्यवसाय थाटून आहे. दर वर्षी उन्हाची चाहूल लागताच आपली हातगाडी तळोदा रस्त्याच्या कडेला उभी असते. शिकंजीसाठी लागणारा बर्फ तळोदा येथून मागवितो. लिंबूही ज्या ठिकाणी स्वस्त मिळतील आणि चांगल्या दर्जाचे मिळतील अशा ठिकाणाहून आणतो. त्याचबरोबर उच्च दर्जाचे सब्जा बीज नंदुरबार येथून मागवितो. सैंधव मीठ, मसाला म्हणून वापरतो. गोड चवीसाठी साखरही उत्तम दर्जाची असते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो." -निंबा भोई, बोरद, ता. तळोदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT