Swine flu esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : आष्टे आफ्रिकन स्वाइन फिवर बाधित घोषित! मृत वराहांच्या अहवालानंतर जिल्हाधिकारी शेट्टींचे उपायोजना करण्याचे आदेश

Latest African Swine Fever News : हा रोग जलदगतीने पसरणारा अधिसूचित रोग असल्याने जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आष्टे गाव व परिसर बाधित क्षेत्र घोषित केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबार : आष्टे (ता. नंदुरबार) येथील क्षेत्र अफ्रिकन स्वाईन फिवर बाधित व निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथील वराहांच्या मृत्यूनंतर नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले होते. तेथून अहवालाअंती वराहांना आफ्रिकन स्वाईन फिवर झाल्याचे कळविण्यात आलेले आहे. (Nandurbar ashte village African Swine Fever infected declared)

हा रोग जलदगतीने पसरणारा अधिसूचित रोग असल्याने जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी आष्टे गाव व परिसर बाधित क्षेत्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारींनी प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियमान्वये आष्टे येथील एक कि.मी. परिघातील भागास बाधित क्षेत्र घोषित केले आहे.

तसेच १० कि. मी. परिघातील क्षेत्र संनियंत्रण क्षेत्र संबोधित करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये आफ्रिकन स्वाईन या रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी संबंधीत विभागांनी मार्गदर्शक सुचनेनूसार उपयायोजनेचे आदेश दिले आहेत. (latest marathi news)

अशा करा उपाययोजना

- बाधित क्षेत्राच्या एक किमी परिसरातील सर्व वराहांचे कलींग करुन त्यांची विल्हेवाट शास्त्रीय पध्दतीने लावावी. त्या परिसराचे निजंतुकीकरण करावे.

- आफ्रिकन स्वाईन फिवर चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित परिसरात सक्रिय संनिरीक्षण व्यापक प्रमाणावर करावे व सुयोग्य जैवसुरक्षा उपाययोजना कराव्यात. पाळीव तसेच जंगली वराहातील अनियमित मर्तुकीवर बारकाईने लक्ष ठेवावे.

- वराहाच्या मासांची विक्री करणाऱ्या आस्थापनाची नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्ण करुन त्या आस्थापनांना स्थानिक पशुवैद्यकांनी नियमितपणे भेटी देऊन नियंत्रण ठेवावे. मोकाट पध्दतीने होणारे वराह पालन टाळावे.

- घरगुती तसेच हॉटेलमध्ये वाया गेलेले, शिल्लक राहिलेले अन्न वराहांना देणे ही याच विषाणूच्या प्रसारास मुख्यत्वे करुन कारणीभूत असल्याने अशा प्रकारचे खाद्य देणे टाळणे गरजेचे आहे. निरोगी वराहाचा घरगुती व कत्तलखान्यातील कच्चे मांस उपपदार्थ तसेच कचरा यांच्याशी संपर्क येऊ देऊ नये.

- वराहपालन केंद्रातील तसेच वराह मांस विक्री केंद्रातील कचरा एकत्रित साठवू नये. सर्व कचरा नष्ट करावा अथवा त्याची सार्वजनिक कचरा व्यवस्थापनाकडून शास्त्रोक्तदृष्ट्या योग्य रितीने विल्हेवाट लावावी.

- वराहपालन करणारे पशुपालक या व्यवसाया संबंधित व्यक्ती (उदा. व्यापारी, कसाई, वितरक ई.) यांच्यामध्ये या रोगाविषयी जागृकता निर्माण करुन रोगाच्या प्रादुर्भावा विषयी सुचना देणे व सुप्त संनिरीक्षण करण्यासाठी अवगत करावे.

- पशुसंवर्धन विभागातील क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी पोलीस व चेकनाके यांच्याशी समन्वय ठेवुन शेजारील राज्यातील वराहाची अनधिकृत प्रवेश होणार नाही, यांची दक्षता घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT