MP present at Bhoomi Pujan of various development works Heena Gavit and officials. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : एकाच दिवशी 30 कोटी विकासकामांचे भूमिपूजन-लोकार्पण

Nandurbar News : ११ गावांत एकाच दिवशी सुमारे ३० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते नुकताच झाला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील शिरपूर तालुक्यातील भोरटेक, भाटपुरा, जापोरे, मांजरोद, पिळोद, घोडसगाव, नांथे, होळ यांसह ११ गावांत एकाच दिवशी सुमारे ३० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा खासदार डॉ. हीना गावित यांच्या हस्ते नुकताच झाला. (Nandurbar Bhoomi Pujan public dedication of 30 crore development works on a single day)

एकेका गावात दीड कोटीपासून आठ कोटी रुपये निधी प्रत्येक गावाला देऊन खासदार डॉ. हीना गावित यांनी जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाउंड, आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक, हायमास्ट लाइट, सभामंडप, जलकुंभ, ठक्कर बाप्पा योजनेत रस्ते या स्वरूपाची विविध विकासकामे केली आहेत. त्याचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

ज्या गावांना कधी दहा लाखाचा निधीसुद्धा मोठ्या मुश्किलीने मिळत होता, त्या गावांना केंद्र सरकारच्या सहाय्याने कोटी कोटी रुपयांचा निधी मिळवून दिला. प्रत्येक गावात रस्ते आणि रोजगार देण्याची तळमळ असून, ग्रामीण भागाचा विकास हाच आमचा हेतू आहे, असे खासदार गावित यांनी सांगितले. केंद्र सरकार राबवत असलेल्या योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आत्मनिर्भर बनावे, असे आवाहनदेखील केले.

होळ गावात तर आठ कोटी ७२ लाख रुपये खर्चाच्या सुमारे ४० विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पार पडले. भूमिपूजनप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते. (latest marathi news)

अन्य गावांतील कार्यक्रम असे

शिरपूर तालुक्यात भाटपुरा गावात सुमारे दोन कोटी ७७ लाख ९८ हजार रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण केले. यात ठक्कर बाप्पा योजनेतून आदिवासी वस्तीत काँक्रिट रस्ता १५ लाख, आदिवासी वस्तीत पेव्हर ब्लॉक १० लाख, आदिवासी वस्तीत सोलर हायमास्ट १० लाख, आदिवासी वस्तीत सोलर हायमास्ट १० लाख.

पाटील समाज वस्तीत सामाजिक सभागृह २१ लाख, जिल्हा परिषद स्तर १५ व्या वित्त आयोगातून महादेव मंदिरासाठी सभामंडप पाच लाख, भागवत माता मंदिरासाठी सभामंडप पाच लाख, शाळा वर्गखोली १० लाख, शाळा वर्गखोली १० लाख, काँक्रिट रस्ता १० लाख, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र ७२ लाख.

पाण्याची टाकी ४५.९८ लाख, गावांतर्गत पेव्हर ब्लॉक पाच लाख, पाणी टँकर तीन लाख, नाना रामदास दोरीक ते मयाराम उदेसिंग राठोड यांच्या शेतापर्यंत रस्ता २२ लाख आणि पाणंद रस्ते अशा एकूण दोन कोटी ७७ लाख ९८ हजार रुपयांच्या कामांचा यात समावेश आहे. या भूमिपूजनप्रसंगी धुळे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. तुषार रंधे, धुळे जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, पंचायत समिती सदस्या धनश्री बोरसे, भाटपुराच्या लोकनियुक्त सरपंच ललिता श्रावण चव्हाण, उपसरपंच रोशन सुरेश सोनवणे यांच्यासह स्थानिक मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Cha.Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT