Fake Seed  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : अनधिकृत कंपन्यांचे बोगस बियाणे खरेदी करू नका : राकेश वाणी

Nandurbar News : बोगस बियाणे अनेक अनधिकृत कंपन्यांमार्फत उत्पादित करून शेतकऱ्यांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने विक्री केले जाते.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकाची लागवड करण्यात येते. बीटी कपाशीचे परवानगी नसलेले व तणनाशकाला सहनशील असणारे बोगस बियाणे अनेक अनधिकृत कंपन्यांमार्फत उत्पादित करून शेतकऱ्यांना अवैधरीत्या छुप्या पद्धतीने विक्री केले जाते. मात्र या बियाण्यामुळे निसर्गाला व जमिनीला हानी पोचते. (Bogus seeds are produced by many unauthorized companies)

त्यामुळे शेतकरी बांधवांनी अशा प्रकारच्या बियाण्याचा वापर करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राकेश वाणी यांनी केले आहे. एटीबीटी या अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता व मानवी शरीरावर होणारे परिणाम लक्षात घेता येत्या खरीप हंगामात शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करू नये.

तसेच अशा प्रकारचे कपाशी बियाणे विक्री करत असताना आढळल्यास संबंधितावर बियाणे कायदा १९६६, महाराष्ट्र कापूस बियाणे नियंत्रण कायदा २००९, बियाणे नियंत्रण आदेश १९८३, पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६, अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा प्रकारचे अनधिकृत कापूस बियाणे विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास कृषी विभागाच्या जिल्हा नियंत्रण कक्षास किंवा तालुका नियंत्रण कक्षास कळवावे.

जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके गुणवत्तापूर्ण व रास्त भावात उपलब्ध होण्यासाठी तसेच समस्या निराकरणासाठी जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर सहा अशा एकूण सात भरारी पथकांची व सात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथकाने वेळोवेळी कृषीनिविष्ठा विक्री केंद्रांना भेटी देऊन तपासणी करून ज्यादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यावर वेळीच योग्य ती कारवाई करावी. (Latest Marathi News)

नेमलेल्या भरारी पथकाने रासायनिक खते व कीटकनाशकांबाबत उगम प्रमाणपत्र तपासणी, मुदतबाह्य निविष्ठांची विक्री रोखणे तसेच पॉस मशिनवरील खताचा ताळमेळ व त्रुटी आढळल्यास अनधिकृत बियाणे साठ्याचा शोध घेऊन जप्तीची कारवाई करावी, असे श्री. वाणी यांनी शासकीय प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

एचटीबीटी बियाण्यामुळे होणारे नुकसान

-अत्यंत कमी उगवणक्षमता.

-कमी उत्पादन.

-बियाणे बोगस निघाल्यास खरेदी पावत्या नसल्यामुळे नुकसानीची हमी नाही.

-तणनाशक अतिवापरामुळे उत्पादन खर्चात वाढ.

-जमिनीची सुपीकता कमी होते.

-कर्करोगसारख्या आजारास आमंत्रण देते.

बोगस बियाणे कसे ओळखाल?

-शासनाचा परवाना व बियाणे प्रमाणित नसणे.

-बियाण्याच्या पाकिटावर कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान व कोणत्या क्षेत्रासाठी वापर करावा याचा उल्लेख नसतो.

-पाकिटावर मालाच्या गुणवत्तेचे विवरण नसते.

खरेदी करताना घ्यावयाची काळजी

-बियाणे अधिकृत परवानाधारकाकडून खरेदी करावे, न चुकता पक्के बिल घ्यावे.

-बिलात पीक, वाण, लॅाट क्रमांक, वजन, अंतिम मुदत कंपनीचे नमूद करावे.

-खरेदी केलेल्या बियाण्याचे वेष्टण/पिशवी, टॅग, खरेदीची पावती व त्यातील थेडे बियाणे पिकाची कापणी होईपर्यंत जपून ठेवावे.

-भेसळीची शंका दूर करण्यासाठी बियाण्याचे पाकीट सीलबंद/मोहोरबंद असल्याची खात्री करावी.

बियाणे व कीटकनाशकांची अंतिम मुदत तपासून घ्यावी.

-छापील किमतीपेक्षा जास्त किमतीने विक्री अथवा इतर तक्रारीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vadgaon Sheri Assembly Election 2024 Result Live: वडगाव शेरी मतदारसंघात तुतारी वाजली; बापू पठारेंचा 5000 मतांनी विजयी

Devendra Fadnavis : फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, एक है तो 'सेफ' है!

Karad South Assembly Election 2024 Results : कऱ्हाड दक्षिणेत काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग! पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव करत अतुल भोसलेंचा मोठा विजय

Madha Assembly Election 2024 Result Live: माढ्यात तुतारीची गर्जना, अभिजित पाटील यांचा दणदणीत विजय

Parag Shah Won in Ghatkopar East Assembly Election: घाटकोपर पूर्व मतदार संघावर भाजपचा झेंडा कायम; पराग शाहांचा मोठ्या फरकाने विजय

SCROLL FOR NEXT