शहादा : टुकी (ता. शहादा) येथील बसस्थानकाजवळ शनिवारी (ता. १६) दुपारी तीन बैलांच्या झुंजीदरम्यान एक बैल बिथरला आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या विस्टा कारची काच फोडून थेट वाहनात शिरला. वाहनात बसलेल्या दामळदा येथील पाचही जणांनी बैलाचा हा थरार अनुभवला. सुदैवाने यात कोणालाही गंभीर इजा झाली नाही. (Nandurbar Bull stuck directly into car incident in Tuki marathi news)
शहादा तालुक्यातील दामळदा येथील उपसरपंच डॉ. विजय नामदेव चौधरी, विद्याबाई विजय चौधरी, लताबाई भरत पाटील, रीताबाई प्रकाश पाटील (चौघे रा. दामळदा), कृष्णा ठाणसिंग गिरासे (रा. भोरटेक) असे पाचही जण कारमधून (जीजे १९, एम ५१५४) शहादा येथील एक लग्नसमारंभ आटोपून दुपारी दीड ते दोनच्या सुमारास परत येत असताना टुकी गावाच्या बसस्थानकाशेजारी तीन बैलांची झुंज सुरू असल्याने त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला थांबविले.
काही क्षणांत तिघांपैकी दोन बैल कारच्या बाजूने पळत सुटले, तर त्यातील एक बैल थेट कारच्या काचेवर आदळला व काच फोडून थेट आत शिरला. डॉ. विजय चौधरी वाहन चालवत होते, तर त्यांच्या बाजूला भोरटेक येथील कृष्णा ठाणसिंग गिरासे (वय ६०) यांच्या अंगावर काच फोडत बैल आदळला. (latest marathi news)
बैल गाडीतच अडकल्याने वाहनातील पाचही जणांनी वाहनाच्या बाहेर सुटका करून घेतली. सर्वांना किरकोळ स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत. मात्र, सर्व जण सुखरूप आहेत. दामळदा, टुकी, जवखेड्यासह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.
दरम्यान, कारमध्ये अडकलेला बैल काढण्यासाठी घटनास्थळी उपस्थित नागरिकांसह ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले. दोर बांधून बैलाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो बाहेर निघू शकला नाही. यामुळे शेवटी कारच्या बाजूचा दरवाजा मोकळा करण्यात आला. दोर बांधून सुमारे दीड तासाच्या प्रयत्नांनंतर बैलाला वाहनातून बाहेर काढण्यात यश आले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.