Home Guard Recruitment esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : होमगार्ड रिक्त पदभरतीसाठी उमेदवारांनी नोंदणी करावी; अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

नंदुरबा : जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागांच्या भरतीसाठी होमगार्ड सदस्य नोंदणी सुरू असून, जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा समादेश होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी केले.

नंदुरबार जिल्हा होमगार्ड कार्यालयातील रिक्त जागा भरण्यासाठी होमगार्ड सदस्य नोंदणीचे आयोजन करण्यात आले असून, १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. (Nandurbar Candidates should register for Home Guard Vacancy)

होमगार्ड नोंदणीचे माहितीपत्रक नियम व अटी याबाबतची विस्तृत माहिती https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login१.php या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. सर्व अर्जांची छाननी झाल्यानंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक क्षमता, मैदानी चाचणी याची तारीख जाहीर करण्यात येईल.

नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, तळोदा (तळोदा पथकांतर्गत धडगाव) अक्कलकुवा व नवापूर (नवापूर महिला वगळून) या पथकामधील पुरुष/महिला होमगार्डची नवीन सदस्य नोंदणी सुरू असून, नोंदणीसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे असतील. (latest marathi news)

पथकातील पोलिस ठाण्यांतर्गत रहिवासी पुरावा म्हणून मतदान कार्ड/आधारकार्ड, शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण, वय २० ते ५० वर्षे, उंची पुरुषासाठी १६२ सेंटिमीटर व महिलांसाठी १५० सेंटिमीटर पुरुषांकरिता छाती न फुगविता ७६ सेंटिमीटर कमीत कमी ५ सेंटिमीटर फुगविणे आवश्यक, तसेच संबंधित पुरुष/महिला उमेवारास विहित वेळेत धावणे व गोळाफेक याची शारीरिक चाचणी द्यावी लागेल.

होमगार्डमध्ये सेवा करू इच्छिणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी उमेदवारांनी नोंदणीसाठी अर्ज करावेत, असेही जिल्हा समादेशक, होमगार्ड तथा अपर पोलिस अधीक्षक श्री. तांबे यांनी कळविले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi Wardha: मराठीतून भाषणाला सुरुवात...काँग्रेसने SC,ST,OBC यांना पुढं जाऊ दिलं नाही, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

IND vs BAN, 1st test: भारताला धक्का! मोहम्मद सिराजला सामना सुरू असतानाच सोडावं लागलं मैदान, जाणून काय झालं

इचलकरंजीत 'जर्मनी गँग'ची दहशत; नादाला लागाल तर जिवंत न सोडण्याची नागरिकांना धमकी, वाहनांची तोडफोड

आग अन् किटाळ! भारतीय गोलंदाजाच्या वेगवान माऱ्याने स्टम्प्स उखडून फेकले; फलंदाज सैरभैर झाले, Video

Latest Marathi News Updates : शुभम जोशी यांची श्री साई संस्थान शिर्डी येथे मुख्य प्रधान पुजारी म्हणून निवड

SCROLL FOR NEXT