Incharge Principal Anjali Sharma present during the encroachment removal campaign esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा अतिक्रमणांवर नगर परिषदेचा हातोडा

Nandurbar : तळोदा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी अंजली शर्मा यांनी रस्त्यावर उतरत मंगळवारी शहरातील भाजी मंडई व स्मारक चौक परिसरातील अतिक्रमणधारकांचे पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : तळोदा नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी अंजली शर्मा यांनी रस्त्यावर उतरत मंगळवारी (ता. १९) शहरातील भाजी मंडई व स्मारक चौक परिसरातील अतिक्रमणधारकांचे पालिका प्रशासनाकडून अतिक्रमण काढण्यात आले; परंतु मुख्य रस्त्यांवर अनेक ठिकाणी अतिक्रमण करणाऱ्यांना या मोहिमेत अप्रत्यक्षरीत्या अभय देण्यात आल्याचे बोलले जात आहे. याबाबत चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे. (Nandurbar City council action on Taloda encroachments)

तळोदा शहरातील बाजारपेठेत असणाऱ्या अतिक्रमणाचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला आहे. मुख्य बाजारपेठेतील अतिक्रमणामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, या अतिक्रमणाकडे वेळोवेळी नगर परिषदेने कानाडोळा केल्याने तो प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनला आहे.

काही दिवसांपूर्वी तळोदा नगर परिषदेच्या मुख्याधिकारीपदी आयएएस अधिकारी असणाऱ्या अंजली शर्मा यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा प्राधान्याने हाती घेतला होता. त्यांनी ६२ अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून अतिक्रमण काढून घेण्याची सूचना दिली होती. विहित मुदतीत अतिक्रमण न हटविल्यास अतिक्रमणावर हातोडा चालविण्यात येईल, असा इशारा दिला होता.

दरम्यान, अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मुख्याधिकारी अंजली शर्मा यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशात बांधकाम शाखेच्या कर्मचाऱ्यांनी पूर्ण फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यासाठी जेसीबी, गॅस कटर इत्यादी आवश्यक साहित्यासह मोहिमेसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र पोलिस बंदोबस्त उपलब्ध होऊ न शकल्याने अतिक्रमण हटावची मोहीम पुढे ढकलण्यात आली होती. (latest marathi news)

दरम्यान, मंगळवारी शहरात पुढे ढकलण्यात आलेली अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. मात्र कर्मचाऱ्यांच्या आदेशात नमूद केल्यानुसार बाजारपेठेतील पक्क्या अतिक्रमणावर जेसीबी चालविण्यात येईल, असा अंदाज होता. मात्र केवळ रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या लॉरीधारकांना सूचना देऊन अतिक्रमण हटविण्याचे सांगण्यात आले.

भाजी मंडई व स्मारक चौक परिसरातील हातगाडीधारकांना हातगाड्या रस्त्यावर न लावण्याच्या सूचना देत अतिक्रमण निर्मूलन मोहिमेच्या सोपस्कार पार पाडण्यात आला. रस्त्यालगत बांधकाम सुरू असणाऱ्याना रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेप्रसंगी प्रभारी मुख्याधिकारी अंजली शर्मा, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, राजेंद्र माळी, स्वच्छता निरीक्षक अश्विन परदेशी, मोहन सूर्यवंशी आदींसह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते. पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तदेखील तैनात होता.

माशी कुठे शिंकली?

दरम्यान, स्मारक चौकातील एक-दोन टपरी वगळता कोणत्याही प्रकारचे पक्के अतिक्रमण हटविण्यात न आल्याने, नेमकी माशी शिंकली कुठे, याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. याबाबत एकच चर्चा शहरात ऐकायला मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT