Road constructed without sewerage works in Vedu Govind Nagar. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोदा पालिकेचा ‘राम भरोसे’ कारभार; वेडू गोविंदनगरात गटारीच्या कामाअधीच काँक्रिटीकरण

Nandurbar News : एखाद्या वसाहतीत रस्त्यांचे काम करण्यापूर्वी त्या वसाहतीत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम आवश्यक आहे.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : एखाद्या वसाहतीत रस्त्यांचे काम करण्यापूर्वी त्या वसाहतीत सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारीचे काम आवश्यक आहे. मात्र येथील वेडू गोविंद नगरात गटारीचे काम न करता, आधी रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जात आहे. भविष्यात गटारीच्या कामासाठी हाच रस्ता पुन्हा खोदण्यात येईल आणि यामुळे पुन्हा रस्त्याची समस्या निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे नागरिकांनी पालिकेच्या या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे. (Concreting before sewer work in Vedu Govind Nagar by taloda municipal corporation )

शहरातील वेडू गोविंदनगरमध्ये पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यामुळे आधी गटारीचे बांधकाम करावे, अशी रहिवाशांची मागणी होती. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून तळोदा पालिकेने संबंधित ठेकेदाराला काँक्रिटीकरणाच्या कामाचे कार्यारंभ आदेश दिले. ठेकेदारानेही कामाला सुरुवात केली. दरम्यान, वसाहतीत गटारी नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पावसाळ्यात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य दिसून आले.

येथे सात ते आठ दिवसांपूर्वीच काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र निचरा होत नसल्याने पाण्यासोबतच रस्त्यावरील काँक्रीटचा थरही वाहून गेला. याविषयी नागरिक पालिका व ठेकेदाराविरुद्ध रोष व्यक्त करीत आहेत. पालिकेने रस्त्याची कामे हाती घेण्याआधी गटारीचे बांधकाम करणे आवश्यक होते. काँक्रीटीकरणामुळे भविष्यात गटारींच्या कामासाठी हाच रस्ता पुन्हा खोदण्यात येईल. यामुळे पुन्हा नवीन समस्या निर्माण होईल, असे नागरिकांचे म्हणणे आहे. (latest marathi news)

पूर्वीही असाच अनुभव

असाच प्रकार शहरातील नवी वसाहत सुशीला श्रीराम पार्कमध्येही संबंधित ठेकेदार करणार होता. अगोदर रस्ता बांधायची तयारी पूर्ण केली. गटार नंतर बांधू, असे सांगितले. त्यावर नागरिकांनी आक्षेप घेत रस्त्याचे सुरू केलेले काम बंद पाडले. अगोदर गटार बांधा आणि त्यानंतर काम करा, असा आग्रह धरल्यामुळे संबंधित ठेकेदारांचा नाईलाज झाला.

ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण नाही

शहरात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांवर व संबंधित ठेकेदारांवर कोणाचेच नियंत्रण नाही. शहरात मोठ्या प्रमाणात तापी पाणीपुरवठा योजनेचे खोदकाम करून ठेवल्याने, ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप होत आहे. सहा महिन्यांपासून अनेक ठिकाणी रस्ते व गटारी अपूर्ण अवस्थेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT