Fake Seed  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Fake Seed Business : अनधिकृत बियाण्याची झळ सर्वांनाच; आळा घालण्यासाठी ‘कृषी’बरोबरच कंपन्या

Fake Seed Business : अनधिकृत कापूस बियाणे विक्रीची झळ अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनाही बसत असून, त्यांच्या विक्रीवरही त्याचा थेट परिणाम होत आहे.

कमलेश पटेल

Nandurbar Fake Seed Business : अनधिकृत कापूस बियाणे विक्रीची झळ अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनाही बसत असून, त्यांच्या विक्रीवरही त्याचा थेट परिणाम होत आहे. परिणामी अधिकृत बियाण्यांचा खप दिवसेंदिवस कमी होत आहे. याला आवर घालण्यासाठी आता कृषी विभागासोबतच अधिकृत बियाणे उत्पादक कंपन्या व परवानाधारक कृषी सेवा केंद्र संचालकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. ( consumption of official seeds is decreasing day by day )

अनधिकृत कापूस बियाणे विक्रीच्या फोफावलेल्या धंद्याची झळ अनेक घटकांना बसत आहे. त्यात अधिकृत बियाणे कंपन्या, परवानाधारक कृषी सेवा केंद्र आदींसह सर्वसामान्य शेतकऱ्यांना याची झळ सोसावी लागत आहे. यात फक्त कथित विक्रेते गब्बर होत आहेत. शासनदरबारी कडक कायदे किंवा अनधिकृत बी-बियाणे विक्रीला आवर घालण्यासाठी कृषी विभागाने धडक मोहीम राबविणे गरजेचे आहे.

अल्पकाळात उत्पादनाचे आमिष दाखवून अनधिकृत बियाणे विक्री करणाऱ्याविरोधात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शासनदरबारी कारवाई करताना नेमके काय अडथळे येतात ते मांडणे आवश्यक आहे. अन्यथा छापे टाकून बियाणे पकडले जाते, त्यात मोजकाच माल सापडतो. बराचसा माल मात्र संबंधित विक्रेता अन्य ठिकाणी लपवून ठेवतात. त्यातून पकडलेल्या मालाचे काहीच सोयरसुतक त्यांना नसते.

त्यासाठी सखोल चौकशी करून धागेदोरे तपासण्याचे कष्ट संबंधित यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. दरम्यान, आपल्या न्याय्य हक्कासाठी विविध संघटना स्थापन झालेल्या आहेत. त्यात अधिकृत परवानाधारक बियाणे विक्रेत्यांनीही आपली संघटना स्थापन केली आहे. कथित अनधिकृत बियाणे विक्रेत्यांच्या बंदोबस्तासाठी आता परवानाधारक कृषी सेवा केंद्र संचालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कारण अनधिकृत बियाणे विक्रीची झळ त्यांनाही सोसावी लागत आहे.

पोलिसांची व खबऱ्यांची मदत शक्य

ग्रामीण भागात पसरलेले या अनधिकृत बियाण्यांचे जाळे नेस्तनाबूद करण्यासाठी कृषी विभागाने पोलिसांचा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग अथवा दूतांमार्फत तपास केल्यास निश्चितच मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बियाण्यांच्या साठा जप्त होईल. यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेणे गरजेचे आहे. जिल्ह्यात अशिक्षितांचे प्रमाण मोठे आहे.

पूर्वी शिक्षणाला फारसे महत्त्व दिले जात नव्हते, नेमके त्यांपैकी बहुतांश लोक मोठ्या प्रमाणावर शेती करतात. त्यांच्या या अज्ञानाचा फायदा कथित अनधिकृत बियाणे विक्री करणारे घेत असून, संबंधितांना वेगवेगळे आमिष दाखवत बियाणे खरेदीस भाग पाडतात. पैसा कमी लागतो म्हणून शेतकरीही त्यास पसंती देऊन नाडला जातो. दर वर्षी शेतात अनधिकृत बियाणे अंकुरले जाते.

या वर्षी तरी निदान या अनधिकृत बियाणे लागवडीपासून शेतकऱ्यांना थांबविण्यासाठी कृषी विभागाने कार्यक्रम आखून गावोगावी जनजागृती करणे गरजेचे आहे. शिवाय अनधिकृत बियाणे विकणाऱ्या टोळीच्या फर्दाफाश करण्यासाठी भरीव कार्यक्रम आखणे गरजेचे आहे, अन्यथा खरीप हंगाम जवळ आल्याने सर्वत्र बियाणे अंकुरले जाईल आणि शेतकरी पुन्हा नाडला जाईल.

''कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी बांधव बियाणे खरेदीस प्राधान्य देतात. याचाच काही विक्रेते गैरफायदा घेऊन अप्रमाणित बियाणे शेतकऱ्यांना विक्री करून फसवणूक करत असतात. खरोखर शेतकरीहिताची जाणीव असेल तर जबाबदारी असलेल्या कृषी-महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बी-बियाणे, खत, औषधी विक्री करणाऱ्या कृषी निविष्ठा केंद्रांची वेळोवेळी तपासणी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. आपली फसवणूक व नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी बांधवांनी तालुका खरेदी-विक्री संघाच्या अधिकृत विक्री केंद्र व कार्यालयात संपर्क साधून प्रमाणित बियाणे, खत, औषधीबाबत माहिती घ्यावी.''-प्रा. मकरंद पाटील, अध्यक्ष, शहादा तालुका खरेदी-विक्री संघ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT