The flood occurred in the Pandhari wat stream passing through the village. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तण जोमात, पीक कोमात, पाऊस उसंत देईना; मशागतीअभावी पीकस्थिती नाजूक

योगिराज ईशी

Nandurbar News : कळंबूसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसामध्ये सातत्य राहिल्याने पिकांमध्ये तण वाढले आहे. यामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होत आहे. पावसाने उसंत घेतली तरच शेतीकामांना वेग देता येईल, असे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. शहादा तालुक्यातील तापी पट्ट्यातील काही भागांत यंदा वरुणराजाची कृपा आहे. ६ जूनच्या सुरवातीपासूनच पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कापूस, मका लागवड करून घेतली. त्यापाठोपाठ पाऊस झाल्याने इतर कडधान्य पिकांची पेरणी उरकून घेतली. ( continuous rains in Kalamba area for past few days )

मात्र त्यानंतर सततच्या पावसामुळे पिकांच्या मशागतीसाठी वेळ मिळत नसल्याने, तण जोमात, तर पीक कोमात, मजुरीत कमालीची वाढ या विवंचनेत शेतकरी वर्ग सध्या सापडला आहे. अशा परिस्थितीत कोळपणी, निंदणी, फवारणी रखडल्याने, पिकांची वाढ खुंटली आहे. मध्यंतरी पावसाच्या थोड्याफार उसंत काळात शेतकरी कामे उरकून घेण्यासाठी धावपळ करीत आहेत, मात्र मजुरीत या वर्षी कमालीची वाढ झाल्याने नैसर्गिकबरोबर आर्थिक फटका सहन करून बळीराजा शेती टिकविण्यासाठी धडपड करीत आहे.

सततच्या पावसामुळे शेताकडे फिरकणेही शक्य न झाल्याने पिकांत तणाचे प्रमाण अधिक वाढले आहे. पावसाने उघडीप दिल्यास व योग्य वेळी योग्य मशागत झाल्यास पिकांची वाढ झपाट्याने होते, मात्र सततच्या पावसामुळे पिकांच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे रखडलेली कामे पावसाच्या उसंतीवरच अवलंबून असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र सध्या तरी बहुतेक शेतकरी वर्ग मिळेल त्या उसंत काळात घरच्या घरी कामे उरकून घेण्यावर भर देत आहेत.(latest marathi news)

वरुणराजाची कृपा

कळंबू येथील पांढरी वाट नाल्याला यंदा लागोपाठ पूरस्थिती उद्‍भवत आहे. नाल्याशेजारील शेतजमिनीत तलावसदृश परिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे येथील शेतातील पीक पाण्याखाली गेले आहे. नाला जणू पाझरत असल्यासारखी परिस्थिती सध्या आहे. गेल्या पाच-सहा वर्षांपासून नाल्याला पूर बघणे दुरापास्त झाले होते.

मात्र या पावसाळ्यात आजपावेतो सात ते आठ वेळा नाला खळखळून वाहून निघाल्याने, वरुणराजाची कृपा असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. नाल्याला जंगल शिवारातून पाणी येऊन कळंबू गावातून मार्गस्थ होतो, नाल्याचे पाणी पुढे म्हैस नदीला मिळून म्हैस नदी थेट सारंगखेडा येथील तापी नदीला जुळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT