Farm laborers while planting cotton in the fields here. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Cotton Farming : पुरेशी ओल नसतानाही कपाशी लागवड सुरू; तळोदा तालुक्यात अद्याप पावसाची नावापुरतीच हजेरी

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Cotton Farming : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड होते. यंदा तळोद्यात अद्याप पावसाने फक्त नावालाच हजेरी लावली आहे. त्यामुळे मे महिन्यात होणारी कापूस लागवड लांबल्याचे दिसून येत आहे. मात्र पावसाअभावी पुरेशी ओल नसली तरी काही शेतकऱ्यांनी कापूस लागवडीला सुरवात केल्याचे दिसून येत आहे. त्यात शेतात पाण्याची सोय असलेले बागायदार शेतकरी मोठ्या संख्येने आहेत.

तळोदा शहरासह तालुक्यातील बोरद, मोड, तळवे, चिनोदा, प्रतापपूर, रांझणीसह परिसरात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड होते. काही बागायतदार शेतकरी मे महिन्यातही कापसाची लागवड करतात. तालुक्यात यंदा मात्र मे महिन्यात होणारी कापूस लागवड लांबली असून बोटावर मोजण्या इतक्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली आहे. याला मुख्य कारण म्हणजे झपाट्याने खालावलेली पाणी पातळी असल्याचे सांगण्यात येत आहे.

शेतकऱ्यांकडून शेतात नांगरटी, वखरणी, सरी बनवून तयार करण्यात आली तरी पाऊस नसल्याने तसेच कापसाला पाणी देणे शक्य होणार नसल्याने कापूस लागवड लांबल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान परिसरात काहीसा हलका पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना आता जोरदार पावसाची आस लागून आहे. मात्र काही बागायती शेतकऱ्यांकडून कापूस लागवडीस सुरवात केली आहे, मात्र त्यांचे प्रमाण नगण्य आहे. (latest marathi news)

कापूस हे उष्ण कटिबंधीय पीक असल्याने हे वातावरण कापूस लागवडीस योग्य असले तरी कापसाला पुरेसे पाणी न मिळाल्यास तापमान जास्त असल्याने मुळांची वाढ होऊ शकणार नाही. त्यामुळे कापसाचे पीक दगावण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, असे शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तरी येत्या काही दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे वातावरणात पाहून काही शेतकरी आता कापूस लागवडीसाठी धजावले आहेत.

दरम्यान शेतकऱ्यांकडून कापसाच्या विविध वाणांविषयी चाचपणी करण्यात येत असून कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना बोगस बियाणे खरेदीपासून घ्यायच्या काळजीबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे. कापसाच्या क्षेत्रात यंदा वाढ होणार असून गेल्या वर्षीपेक्षा यंदा कापूस लागवडीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज कृषी विभागाला असून त्यांच्याकडून यंदाचे हवामान कापूस पिकासाठी पोषक असल्याचे सांगण्यात येत आहे.

''सध्या मृग छायेच्या वातावरणात कापूस लागवड केल्यास या वातावरणात झाडांचा बचाव होऊ शकतो तसेच कापसाला फायदा होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांना कापूस लागवडीस काही हरकत नाही.''-अरुण मराठे, शेतकरी, रांझणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's T20 World Cup: टीम इंडियाचा पहिल्याच सामन्यात पराभव; न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती

Rahul Gandhi यांच्या अडचणी वाढणार? पुणे विशेष न्यायालयाने समन्स बजावले, २३ ऑक्टोबरला हजर राहण्याचे आदेश, प्रकरण काय?

Raj Thackeray On Zirwal : 'तुम्ही सत्ताधारी, संविधानिक पदावर बसलेले, तुम्ही निषेध कसले नोंदवताय?'; झिरवाळांच्या आंदोलनावर राज ठाकरे संतापले

Women's T20 WC: भारत-न्यूझीलंड सामन्यात ड्रामा! रनआऊटनंतरही केरला अंपायरने दिलं नॉटआऊट, हरमनप्रीतही वैतागली; नक्की काय झालं?

Western Railway वर 5 आणि 6 ऑक्टोबरला तब्बल 10 तासांचा Block, काही गाड्या रद्द, अनेक ट्रेन विलंबाने धावणार, पाहा संपूर्ण तपशील

SCROLL FOR NEXT