Khandesh Akhaji Festival esakal
उत्तर महाराष्ट्र

Khandesh Akhaji Festival : आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं! सासर, माहेरवाशिणींना ‘आखाजी’ सणाची ओढ

सुनील माळी

वडाळी : खानदेशात धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा आणि मालेगाव जवळच्या काही भागात आखाजी सणाला विशेष महत्त्व आहे. इथली ‘अहिराणी’ ही बोलीभाषा अतिशय गोड, मधुर आणि खूप रसाळदेखील आहे. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला येणारा अक्षयतृतीया म्हणजे ‘आखाजी’ हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा आणि प्रिय सण!

सासरी गेलेली प्रत्येक मुलगी या सणाला आपल्या माहेरी येणार म्हणजे येणारच. कधी काळी आखाजीसाठी आपला भाऊराया आपल्याला घ्यायला केव्हा येणार, याकडे तिचे डोळे लागलेले असत. मात्र काळाच्या ओघात आखाजी सणाला महत्त्व कमी होताना दिसत आहे. (Nandurbar khandesh cultural Akhaji festival news)

गवराई काय काय इसरनी

चैत्र पौर्णिमेला ‘गवराई’ या देवतेची स्थापना मुली आपल्या घरी करीत असतात. गौराई म्हणजे पार्वती. आखाजीच्या आदल्या दिवशी मुली पारंपरिक पोशाख करून कुंभाराच्या घरी गाणी म्हणत, टिपऱ्या खेळत जातात. कुंभाराने शंकर आणि पार्वतीच्या छान मातीच्या प्रतिकृती बनविलेल्या असतात.

पारंपरिक ग्रामीण मुली मूर्ती वाजतगाजत, गाणी म्हणत अतिशय उल्हसित वातावरणात घरी आणतात. घरात एका कोनाड्यात तिची स्थापना करतात. मनोभावे पूजा करतात. गौराईला फुलांचा हार वगैरे काही लागत नाही. टरबुजांच्या बियांचा हार, शेंगा, गोडशेव यांचे हार गुंफण गौराईला अर्पण केले जातात.

लाकडांची दोन हात असलेली एक साधी सरळ गौराई असते. आंब्याचा मोसम असल्यामुळे कैऱ्यांचा घड, रामफळ गौराईपुढे विशिष्ट पद्धतीने टांगलेले असतात. सांजोऱ्या, शेवया, गुळाचा नैवेद्य दाखविला जातो. आखाजीच्या दिवशी गौराईमातेच्या स्नानासाठी नदीवरून, विहिरीवरून, मळ्यातून पाणी आणतात. त्या वेळी गाणीही गात असतात. टिपऱ्या खेळत असतात. डोक्यावर चुंबळ, त्यावर तांब्या, तांब्यात पाणी आणि आंब्याची पाने आणि पारंपरिक

साती कुंड्यावरी कुंड्यावरी नागीन पसरनी

तठे मनी गवराई, गवराई काय काय इसरनी

यांसारखी अस्सल खानदेशी गाणी म्हणत या मुली आपल्या गवराईचा गजर करतात. (latest marathi news)

आमरस रस आणि पुरणपोळीचा खास नैवेद्य

आंब्याचा मोसम म्हणून या दिवशी पुरणाची पोळी आणि आंब्याचा रस यांचा नैवेद्य म्हणून दिला जातो. पुरणाची पोळी हे तर खानदेशच्या लोकांचे अत्यंत मनापासून आवडणारे पक्वान्न. या दिवशी पुरणाच्या पोळीला फार महत्त्व असते. एक मोठे अर्धगोलाकृती मातीचे भांडे ज्याला खापर म्हणतात, त्यावर पुरणाची पोळी करता येणे म्हणजे खऱ्या अर्थाने सुगरण असे समजले जाते.

आथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खाय वं

उंच व मजबूत झाडांना झोके बांधून तरुण मुली, सासुरवाशिणी, आपल्या विविध रंगी पारंपरिक पोशाखात झोक्यावर गाणी गातात. त्या आपल्याच धुंदीत अगदी मग्न असतात. नऊवारी रंगीत शालू, खानदेशी पद्धतीने अलंकार, केसांचा अंबाडा, नाकात नथ या आपल्या पारंपरिक पोशाखांनी नटून टिपऱ्यांच्या तालावर गाणे म्हणत त्यांच्यासह सारा परिसर बेभान होऊन धुंद झालेला असतो.

कोणत्याही सणामागे किंवा तो साजरा करण्यामागे काही उद्देश असतात. धार्मिक भावना तर जोपासल्या जातातच; पण यानिमित्ताने अनेक कुटुंबे एकत्र येऊन गुण्यागोविंदाने, आनंदाने एकमेकांना भेटून आपला आनंद द्विगुणित करतात. अक्षयतृतीयेची गाणी खानदेशात खेडोपाडी मुली गातात. काळानुरूप आखाजी सणाची उत्सुकता कमी कमी होत चालली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

SCROLL FOR NEXT