Crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीस 2 वर्षांचा कारावास

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : किरकोळ कारणावरून एकावर जीवघेणा हल्ला करून तेथे उपस्थित एकासही मारहाण करून दुखापत करणाऱ्या येथील एकास न्यायालयाने दोन वर्षे कारावास व २५ हजारांचा दंड ठोठावला.

शहरातील कोरीट रोडजवळ राहणारे यशवंत राजपूत यांचे वेल्डिंग दुकानात मोसम ऊर्फ मोहित ऊर्फ दादू मराठे (रा. होळ शिवार, नंदुरबार) दुकानासमोर आला व त्यास यशवंत राजपूत यांनी वेल्डिंग दुकानात काम करत असताना ‘तू दारूच्या रिकाम्या बाटल्या माझ्या दुकानाच्या मागील बाजूस टाकत जाऊ नकोस’ असे सांगितल्याचा राग येऊन. (Nandurbar 2 years imprisonment for fatal attack accused)

आरोपी मोहित मराठे याने यशवंत राजपूत यांच्याशी हुज्जत घालून शिवीगाळ करण्यास सुरवात केली व एका लाकडी दांडक्याने त्यांच्या डोक्यावर जोरात मारल्याने त्यांना रक्तस्राव होऊन ते खाली कोसळले. त्या वेळी तेथे उपस्थित एकजण भांडण सोडविण्यासाठी गेले असता मोहित मराठे याने त्यांनाही हातापायावर लाकडी दांडक्याने मारहाण केली व तेथून निघून गेला होता.

त्याअन्वये शहर पोलिस ठाण्यात २९ डिसेंबर २०२० ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्याकडे दिला.

श्री. पाटील व त्यांचे सहकारी पोलिस यांनी आरोपीस अटक करून गुन्ह्याचा शास्त्रोक्त पद्धतीने तपास करीत महत्त्वाचे पुरावे जमा केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीविरुद्ध मुदतीत दोषारोपपत्र प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार यांच्या न्यायालयात सादर केले होते.

खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. बी. शुक्ला, नंदुरबार यांच्यासमक्ष झाली. खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे साक्षीदार तपासण्यात आले. त्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या आहेत.

यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायाधीश, यू. बी. शुक्ला, नंदुरबार यांनी आरोपीस दोषी ठरवत दोन वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

खटल्याचे कामकाज सरकारी पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता ॲड. बी. यू. पाटील यांनी पाहिले. पैरवी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक राहुल भदाणे, पैरवी अंमलदार नितीन साबळे व पोलिस नाईक गिरीश पाटील यांनी कामकाज पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT